घरताज्या घडामोडीUkraine: बॉम्ब वर्षावातही आईने वाचवला पोटचा गोळा, मेट्रो स्टेशनवर दिला बाळाला जन्म

Ukraine: बॉम्ब वर्षावातही आईने वाचवला पोटचा गोळा, मेट्रो स्टेशनवर दिला बाळाला जन्म

Subscribe

रशिया हल्ल्यामुळे युक्रेनच्या लाखो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रशियान सैनिकांच्या एअरस्ट्राईकमध्ये युक्रेनच्या अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या मोठ्या शहरांमध्ये रोज लोकांचे जीव जात आहेत. यादरम्यान राजधानी किवच्या सब-वे (मेट्रो स्टेशन) मध्ये आश्रय घेणाऱ्या एका महिलेने मुलाला जन्म दिला आहे. हा सब-वे २५ फेब्रुवारीपासून शेल्टर म्हणजे आश्रय स्थळ म्हणून वापर केला जात आहे.

युक्रेनमध्ये जास्त करून सब-वे अंडरग्राऊंड आहेत. हे जमीनच्या खूप खाली मजबूत बनवले गेले आहेत. त्यामुळे युक्रेनच्या लोकांना आशा आहे की, सब-वेमध्ये आश्रय घेतल्यानंतर रशियाच्या बॉम्ब हल्ल्याने नुकसान होणार नाही. घरापेक्षा सब-वे त्यांना सुरक्षित वाटत आहे.

- Advertisement -

दरम्यान युक्रेनमध्ये सुरू असलेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे लोकं आश्रय घेण्यासाठी दुसऱ्या शेजारील देशात पळून जात आहेत. आतापर्यंत १ लाख युक्रेनमधील लोकांनी पोलंडमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले आहे. दरम्यान यापूर्वी संयुक्त राष्ट्रातील निर्वासित समस्यांचे उच्चायुक्त फिलिपो ग्रांडी म्हणाले होते की, ‘गेल्या ४८ तासांमध्ये युक्रेनचे ५० हजारांहून अधिक नागरिक शरणार्थी होऊन दुसऱ्या देशांमध्ये पोहोचले आहेत. आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी देश सोडला आहे. यामधील जास्तीत जास्त लोक पॉलंड आणि मोल्दोवात पोहोचले आहेत. अजूनही लोकं देश सोडून जात आहेत. जर युद्धाची परिस्थिती अशी कायम राहिली तर लवकरच हा आकडा वाढून ४० लाखांपर्यंत पोहोचू शकतो.’

- Advertisement -

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेन हल्ल्याविरोधात सादर केलेल्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ १५ पैकी ११ सदस्य देशांनी मतदान केले. तसेच रशियाने या प्रस्तावाविरोधात वीटोचा वापर केला. रशिया हा प्रस्ताव फेटाळण्यासाठी वीटोचा वापर करेल, याचा सगळ्यांना अंदाज होता. दरम्यान यामध्ये भारत, चीन आणि यूएईने मतदानात भाग घेतला नाही. तर पाश्चात्य देशांनी सांगितले की, ‘हा प्रस्ताव म्हणजे युक्रेनविरुद्ध आक्रमकता आणि कारवाईसाठी रशियाला जागतिक स्तरावर एकाकी पडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे.’


हेही वाचा – Russia-Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्रपतींनी देश सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळला; म्हणाले, ‘माझी सुटका नको, दारुगोळा हवा’


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -