Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Viral Video: प्रेग्नंट असून महिलेचं दुर्लक्ष; विमान प्रवासादरम्यान अचानक बाळाला दिला जन्म

Viral Video: प्रेग्नंट असून महिलेचं दुर्लक्ष; विमान प्रवासादरम्यान अचानक बाळाला दिला जन्म

Related Story

- Advertisement -

अमेरिकेतून एक थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. अमेरिकेत एका प्रेग्नंट महिलेची डिलिव्हरी विमानात झाली. अजब म्हणजे बाळाला जन्म दिलेल्या या महिलेला आपण प्रेग्नंट असल्याची कल्पनाही नव्हती. ही महिला ज्या विमानात होती ते विमान सॉल्ट लेक सिटीहून होनोलुलुकडे जात होतं. हा सर्व प्रकार एका टिकटॉक व्हिडिओनंतर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, बाळाला जन्म दिलेल्या महिलेचे नाव लेविनिया मोंगा असे आहे. या महिलेचं हे बाळ प्रिमॅच्यूअर आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लेविनियाने आपल्या प्रेग्नेंसीच्या २६ ते २७ आठवड्यानंतर या बाळाला जन्म दिला आहे. असे असले तरी सध्या लेविनिया आणि तिचं बाळ पूर्णतः सुरक्षित आहे. या घटनेनंतर या महिलेने सोशल मीडियावर आनंद देखील व्यक्त केला आहे.

जुलिया हैंसन नावाच्या एका महिला प्रवाशाने हा शूट केलेला लेविनियाचा हा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाला. यावेळी अमेरिकेतील रहिवासी असलेल्या जुलियानं सांगितले की, ‘एका गर्भवती महिलेला विमानात प्रवेश कसा दिला’,असा प्रश्न देखील तिने उपस्थितीत केला.

- Advertisement -

जुलियानं पुढे असेही सांगितले की, ही महिला तिच्या जवळच बसली होती. लेविनियाला ती प्रेग्नंट असल्याची तिला जराही कल्पना नव्हती. प्रेग्नंट असून महिलेचं दुर्लक्ष झाल्याने विमानप्रवासादरम्यान अचानक तिने बाळाला जन्म दिल्याचा प्रकार घडला. मात्र विमानातील सर्व क्रु मेंबर्सनी फ्लाईटमध्ये या महिलेची डिलिव्हरी झाली असून तिच्या हिमतीची दाद देखील दिली आणि त्या महिलेला शुभेच्छा दिल्यात.

- Advertisement -

डेल्टा एअरलाईन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमचे ग्राहक आणि क्रु मेंबर्सची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असते. आमचा स्टाफ वैद्यकिय आपातकालीन स्थिती सांभाळण्यास सक्षम आहे. तर याबाबतीत पायलट आणि क्रु मेंबर्स यांनी प्रोटोकॉल्सचं पालन केलं असून अशा अपातकालीन परिस्थितीत महिला आणि बाळाची काळजी घेण्यात आली त्यानंतर लँडिंग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -