Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE corona vaccination : कोरोनामुक्त रुग्णांसाठी लसीचा एकचं डोस ठरतोय पुरेसा? अभ्यासकांचा दावा

corona vaccination : कोरोनामुक्त रुग्णांसाठी लसीचा एकचं डोस ठरतोय पुरेसा? अभ्यासकांचा दावा

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. दरम्यान अनेक देश कोरोनाविरोधी लसींवर संशोधन करत आहेत. कोरोनाविरोधात कोणती लस प्रभावी ठरु शकते किंवा आहे याबाबतचा अभ्यास संशोधकांकडून सुरु आहे. दरम्यान कोरोनाविरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते. मात्र एक संशोधनात असे समोर आले आहे की, जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांचासाठी लसीचा एकचं डोस प्रभावी ठरत आहे. अशा कोरोनामुक्त लोकांसाठी कोरोना लसीचा एक डोस विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रभावी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करत आहे,

लंडनमधीस इम्पीरियल कॉलेज, क्वीन मॅरी युनिर्व्हसिटी आणि युनिर्व्हसिटी कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी एकत्र येत हे संशोधन केले आहे. या संशोधनाअंती असा दावा करण्यात आला की, कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णाने कोरोनाविरोधी लसीचा डोस घेतल्यानंतर त्याचा शरीरात पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती तयार झालेली असते. दक्षिण आफ्रिकेच्या व्हेरियंटमुळे संक्रमित झालेल्या रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. तसेच हा अभ्यास ब्राझील (P.1) तसंच भारतीय (B.1.617) आणि (B.1.618) या व्हेरियंटच्या बाबतीतही लागू होऊ शकतो अशी आशा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शास्त्रज्ञांनी या अभ्यासासाठी फायजर-बायोएनटेक लसीचा वापर केला होता. या अभ्य़ासात असेही दिसून आले की, जे रुग्ण रुग्ण आधी कोरोनाची बाधा झाला किंवा ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत किंवा एकही लक्षण नाही अशा नागरिकांवर लसीचा एकच डोस अधिक प्रभावशाली ठरत आहे. मात्र, ज्या लोकांना कोरोना झालाच नाही परंतु त्यांनी लसीचा पहिला डोस घेऊनही त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती. त्यामुळे अशांना कोरोना होण्याचा धोकाही अधिक होता. असेही या अभ्यासातून समोर आले.

याबाबत इम्पीरियल कॉलेजचे प्रोफेसर रोजमेर बॉयटन यांनी सांगितले की, या अभ्यासातून असेही समोर आले की, ज्या लोकांना लसीचा एकच डोस मिळाला आहे आणि याआधी त्यांना कोरोना झालेला नाही, अशा लोकांना कोरोनाचा नवीन स्ट्रेनचा होण्याचा धोका आहे. यामुळे लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेणं गरजेचं आहे. तसेच नवनवीन स्ट्रेनच्याविरोधात लढण्यासाठी अधिकाधिक लोकांना लस देणं गरजेचं आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -