घरदेश-विदेशजगातलं पहिलं 'तरंगणारं' डेअरी फार्म

जगातलं पहिलं ‘तरंगणारं’ डेअरी फार्म

Subscribe

या आगळ्या-वेगळ्या डेअरी फार्ममध्ये या 'रि-सायकलिंग' प्रक्रियेवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे.

जगात अशा काही मानवनिर्मित वास्तू आहेत ज्या आपल्याला खरोखरच थक्क करुन टाकतात. नेदरलँडमध्येही सध्या अशीच एक भन्नाट वास्तू उभारली जात आहे. नेदरलँडच्या रोटरडॅम इथे जगातलं पहिलं तरंगणारं डेअरी फार्म बांधलं जात आहे. वर्षाअखेरीपर्यंत तरंगणाऱ्या डेरी फार्मच्या बांधकामाला सुरुवात होईल. या डेअरी फार्मचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे माणसांऐवजी चक्क रोबोट गायींचं दूध काढणार आहेत. रोटरडॅमसह आसपासच्या शहरांतील दुधाची वाढची गरज लक्षात घेऊन बेलाडोन या डच कंपनीने हे प्रोजेक्ट सुरु करत असल्याचं समजतंय. उपलब्घ माहितीनुसार या फार्ममध्ये चांगल्या जातकुळीच्या आणि सशक्त अशा ४० ते ४५ गायी ठेवण्यात येणार आहेत. जगातलं हे पहिलंच तरंगणारं डेअरी फार्म असून, शहराच्या जवळच त्याची उभारणी केली जात आहे. जेणेकरुन दूधाची ने-आण करताना वाहतुकीच्या दृष्टीने कोणताही अडथळा येणार नाही. तसं वाहतुकीचा खर्च देखील नियंत्रणात राहील.

floatingfarm
सौजन्य- सोशल मीडिया

‘रि-सायकलिंग’वर अधिक भर

या आगळ्या-वेगळ्या डेअरी फार्ममध्ये या ‘रि-सायकलिंग’ प्रक्रियेवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. फ्लोटिंग डेअरीचे जनरल मॅनेजल अलबर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रेस्टॉरंट तसंच फूड फॅक्ट्रीमधून जे अतिरिक्त किंवा उरलेलं अन्न बाजूला काढलं जाईल ते इथल्या गायींना खुराक म्हणून दिलं जाईल. जेणेकरुन या फार्ममधील गायींच्या खुराकावरील एक्स्ट्रा खर्च वाचेल आणि अन्नाची नासाडीही होणार नाही. याशिवाय फार्ममध्ये वापरण्यात येणारी वीज सोलार पॅनेलच्या माध्यमातून निर्माण केली जाणार आहे.

हेही वाचा : जगातील पहिली समुद्रामधील ‘आर्ट गॅलरी’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -