घरदेश-विदेशपतीच्या मृत्यूनंतर ३ वर्षांनी सरोगसीमुळे 'ती' झाली आई

पतीच्या मृत्यूनंतर ३ वर्षांनी सरोगसीमुळे ‘ती’ झाली आई

Subscribe

मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या डॉ. फिरोझा पारेख यांच्याबद्दल तिला माहिती मिळाली. सुप्रियाने थेट मुंबई गाठली आणि डॉक्टरांची भेट घेतली.

नियती काहींच्या आयुष्यात आनंद घेऊन येते, तर काहीच्या आयुष्यात दु:ख. बंगळुरुमधील सुप्रिया जैन या तरुणीच्या बाबतीत असेच काहीसे झाले आहे. तीन वर्षांपूर्वी कार अपघातात तिचा पती गेला. जीवनसाथीच गेल्यामुळे ती कोलमडून गेली. पण पतीच्या मृत्यूनंतर तब्बल ३ वर्षांनी ती आई झाली आहे. आणि तिच्या आयुष्यात या बाळाच्या येण्याने आशेचा छोटासा किरण आला. नवरा हयात असताना तिने मूल होण्यासाठी उपचार सुरु केले होते. माध्यमातूनच तिला हे मातृत्व प्राप्त झाले आहे. पण ही सगळी प्रक्रिया सोपी नव्हती. अनेकदा अपयश आल्यानंतर अखेर सरोगसीच्या माध्यमातून तिला बाळ झाले.

नेमकं काय झालं?

सुप्रिया जैन आणि गौरव एस जोडप्याचं लग्न २०१० साली झाले. लग्नाची ५ वर्षे झाल्यानंतर ऑगस्ट २०१५ पासून मूल होण्यासाठी उपचारांना सुरुवात केली. नैसर्गिकरित्या गर्भधारणा शक्य नाही हे कळाल्यावर त्यांनी IVF चा पर्याय सुचवण्यात आला. त्यासाठी गौरवचे शुक्राणू जमा करण्यात आले. उपचार सुरु झाल्यानंतर तो आई-वडिलांना भेटला आणि लवकरच तुम्हाला गोड बातमी देतो असे देखील सांगितले. आणि त्याच दिवशी त्याचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. गौरवच्या मृत्यूनंतर सुप्रियाची मानसिक स्थिती ढासळली. पण जी गोड बातमी गौरव देणार होता. त्या बाळासाठीचे प्रयत्न तिने सोडले नाही. घरातल्यांची कोणतीही परवानगी न घेता तिने पुन्हा इलाज सुरु करयाचे ठरवले.

- Advertisement -

सुप्रियाने गाठली मुंबई

मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या डॉ. फिरोझा पारेख यांच्याबद्दल तिला माहिती मिळाली. सुप्रियाने थेट मुंबई गाठली आणि डॉक्टरांची भेट घेतली. गौरवच्या मृत्यूपूर्वी कोल्ड स्टोअर केलेले शुक्राणू ती बंगळुरुमधून मुंबईला घेऊन आली. त्यानंतर IVF चे प्रयत्न करण्यात आले.पण सुप्रियाच्या आरोग्यामुळे तिची गर्भधारणा दोनदा यशस्वी ठरली नाही. त्यामुळे डॉक्टरांपुढे आव्हान होत. त्यामुळे शेवटचा प्रयत्न हा सरोगसीचा होता.तो पर्याय डॉक्टरांनी अवलंबायचे ठरवले. तीन वर्षांपूर्वी स्टोअर केलेल्या शुक्राणूमधून सरोगसी होणे हे देखील कठीण होते. त्यातच दोन प्रयत्न फोल गेल्यानंतर आता हा शेवटचा प्रयत्न सरोगसीचा होता आणि तो यशस्वी झाला.

बाळाचा आनंद

सुप्रियाला बाळापेक्षा गौरवचे बाळ हवे होते. तीन वर्ष तिने या मागे मेहनत घेतली. अखेर तिला सरोगसीच्या माध्यमातून बाळ झाले. ती कामानिमित्त बालीला असताना तिला फोनवरुन ही बाळ झाल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे ज्या दिवशी तिने शेवटी गौरवशी शेवटचा संवाद साधला होता. तीन वर्षांनी त्याच दिवशी तिने तिच्या बाळाला हातात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -