घरताज्या घडामोडी'या' देशात मास्क न घातल्यास दिली जाते भयंकर शिक्षा

‘या’ देशात मास्क न घातल्यास दिली जाते भयंकर शिक्षा

Subscribe

या देशात मास्क न घातल्यास कठोर शिक्षा होते.

कोरोना विषाणूने जगात अक्षरश: थैमान घातले असून हा व्हायरस जगभरातील १९० हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. या कोरोनाचा प्रसार होऊ नये, याकरता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क घालणे सक्तीचे केले आहे. मात्र, तरी देखील अनेक जण याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पण, मास्क न घातल्यास शिक्षा देण्याच्या बाबतीत अरब देश सर्वांच्या पुढे आहेत. या देशांमध्ये फेस मास्क न घालणाऱ्यांवर सरकारकडून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येत आहे.

तीन वर्ष तुरुंगवास

कुवेत आणि कतारमध्ये जर एखाद्या व्यक्तीने मास्क घातले नाही, तर अशा लोकांची थेट तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडून दंडही आकारण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुवेतमधील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मास्क न घातल्यामुळे दोषी ठरलेल्या व्यक्तीला तीन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. तर कतारमध्ये मास्क न घातल्यास तब्बल तीन वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

- Advertisement -

दंडही आकारला जाणार

केवळ तुरुंगवास नाहीतर दंडही आकारण्यात येणार आहे. कुवेतमध्ये जास्तीत जास्त दंड ५ हजार (१६,२०० डॉलर) इतका आहे. तर कतारमध्ये हा दंड तब्बल ३ पटींनी अधिक आहे, म्हणजेच २००,००० रियाल (५५,००० डॉलर) इतका आहे.


हेही वाचा – खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी प्रेक्षकांच्या जागी ‘सेक्स डॉल्स’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -