घरसंपादकीयदिन विशेषप्रतिभावान रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर

प्रतिभावान रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर

Subscribe

चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचा आज स्मृतिदिन. चंद्रकांत चव्हाण हे बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक, रहस्यकथाकार होते. त्यांचा जन्म ९ जून १९०६ रोजी झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. १९४२ च्या चळवळीत तुरुंगात असताना ‘सामान्य माणसासाठी लिही’ असे बाबूरावांना सांगण्यात आले. सामान्य माणसाकरिता लिहायचे म्हणजे काय हे बाबूरावांना पडलेले कोडे होते. बाबूरावांना नाटकाची आवड होती.

एका नाट्यक्लबाचे ते सभासद होते. त्या नाट्यक्लबातून ते एकदा विजयदुर्ग किल्ल्यात गेले आणि परत आल्यावर त्यांनी ‘सतीची समाधी’ नावाची गोष्ट लिहिली; ती अस्नोडकरांच्या ‘करमणूक’मधून प्रसिद्ध झाली. त्याच दिवशी बाबूरावांना नाटककार अच्युत बळवंत कोल्हटकर भेटले. छान गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

एका मोठ्या माणसाला तुझी गोष्ट खूप आवडली आहे असे म्हणून ते बाबूरावांना नाथ माधव यांच्याकडे घेऊन गेले. नाथ माधवांनी अशाच रहस्यकथा लिही असे सुचवले. बाबूरावांनी मग लेखणी हाती घेतली, ती अखेरच्या श्वासापर्यंत खाली ठेवली नाही. त्यांनी एकूण १०४२ रहस्यकथा लिहिल्या. खर्‍या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसांना मराठी वाचनाची गोडी लावली.‘चार आणे माला’पासून त्यांनी सुरुवात केली.

त्यांचे ‘नायक’, ‘झुंजार’, ‘धनंजय-छोटू’, ‘मेजर सुदर्शन’, ‘इन्स्पेक्टर दिलीप’, ‘दर्यासारंग’ हे मराठी घरांघरांतून फिरले. तत्कालीन लोकप्रिय कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या कादंबर्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबर्‍या चोरून वाचल्या. बाबूरावांच्या कथांना पाश्चात्त्य कथांचा आधार असायचा, पण त्या कथांना मराठीत लिहिताना महाराष्ट्रीय वातावरणाचा साज असायचा. अशा या प्रतिभावान रहस्यकथाकाराचे ५ जुलै १९९६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -