घरसंपादकीयदिन विशेषकृषी शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग खानखोजे

कृषी शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग खानखोजे

Subscribe

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे एक मराठी कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1884 रोजी वर्धा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षणानंतर ते १९११ मध्ये अमेरिकेत गेले व त्यांनी ओरेगन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले.

अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर ते मेक्सिकोत गेले. १९२० पासून ते १९४७ पर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीकनिर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात हायब्रीड मका, तांब्या रोगाला तोंड देणारा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याचे उत्पादन, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, आदींवर संशोधन करून मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषीसंचालक म्हणून नेमले होते. मेक्सिकोतील शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या भिंतीवर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व इतर थोर व्यक्तींच्या भव्य भित्तीचित्रांच्या पंक्तीत त्यांचे म्यूरल असून चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश भाषेत ‘आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल’ असे लिहिले आहे.

- Advertisement -

मेक्सिकोत सहकारी तत्त्वावर शेती करण्यासाठी त्यांनी शेतकरी संघ स्थापन केले. मका व जंगली वनस्पतीचे संकर करून तेवो-मका ही नवी जात निर्माण केली. त्यात एकेका ताटावर तीस-तीस कणसे येऊ लागली. जंगली वालावर संशोधन करून वर्षातून दोनदा पीक देणारी जात विकसित केली. शेतकर्‍यांना पिकांची लागवड करता यावी म्हणून स्पॅनिश भाषेत वीस पिकांवर पुस्तिका छापल्या. मसाल्याचे अनेक पदार्थ त्यांनी मेक्सिकोत उगवून दाखवले. त्यांनी ‘तेवी-मका’ ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. १९०८ पासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गेल्यावर त्यांनी गदर पक्ष स्थापन करण्यात पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. अशा या थोर शास्त्रज्ञाचे 18 जानेवारी १९६७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -