घरसंपादकीयदिन विशेषपहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

Subscribe

पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी लोकप्रिय नेते होते. त्यांचा जन्मदिन हा बाल दिन म्हणूनही देशभर साजरा केला जातो. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खासगी शिकवण्यांद्वारे झाले. नंतर ते इंग्लंडला आणि त्यानंतर हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान या विषयात पदवी घेतली.

ते १९१२ मध्ये भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरुल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.

- Advertisement -

सप्टेंबर १९२३ मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले. १९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला. ७ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला. हिंदी चिनी भाई भाई, अशी घोषणा देऊन चीनने बेसावधपणे भारतावर केलेला हल्ला नेहरुंच्या खूपच जिव्हारी लागला.अशा या थोर नेत्याचे २७ मे १९६४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -