घरसंपादकीयदिन विशेषश्रेष्ठ समीक्षक मधुकर हातकणंगलेकर

श्रेष्ठ समीक्षक मधुकर हातकणंगलेकर

Subscribe

मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर हे मराठी समीक्षक होते. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९२७ रोजी कोल्हापूरमधील हातकणंगले येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हातकणंगलेत झाले. १९४४ मध्ये ते मॅट्रिक झाले. १९४८ मध्ये त्यांंनी मुंबई विद्यापीठातून इंग्रजीमधून बीए, १९५० मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी, मराठीतून एमए केले. त्यानंतर त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन महाविद्यालय सांगली येथे अर्धव्याख्याता म्हणून अध्यापन कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे धारवाड येथे अ‍ॅग्रिकल्चरल महाविद्यालयात ते पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले.

१९५६ मध्ये ते विलिंग्डनमध्ये परतले आणि तिथेच ते प्राध्यापकापासून ते प्राचार्य असे सलग १९८७ पर्यंत काम करीत राहिले. मराठीतील अक्षरवाङ्मय इंग्रजीत अनुवादित करून त्यांनी मराठीचे स्थान देश आणि जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले. महाराष्ट्राबाहेरच्या भारताला आणि जागतिक साहित्यविश्वाला मराठीतील कसदार लेखन पोहोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची ठरली. मधुकर हातकणंगलेकर हे वास्तविक इंग्रजीचे प्राध्यापक, पण त्यांचा मराठी साहित्याचा व्यासंग खूप दांडगा होता.

- Advertisement -

त्यातूनच त्यांनी ललित लेखनाला प्रारंभ केला आणि पुढे जाऊन ते समीक्षात्मक लेखन करू लागले. तत्कालीन सत्यकथा, समाजप्रबोधन पत्रिका, नवभारत, वसंत, वीणा, महाद्वार अशा नियतकालिकांतून त्यांचे लेखन चांगलेच गाजले. पुढे त्यांनी अनेक इंग्रजी कथांचे मराठीत लेखन केले, तर गो.नी.दांडेकर यांची ‘माचीवरचा बुधा’ आणि व्यंकटेश माडगूळकर यांची ‘सती’ या कांदबर्‍यांचे इंग्रजीत अनुवाद केले. त्यांनी त्यांचे ‘उघडझाप हे आत्मवृत्त वाचकांच्यासमोर आणले. अशा या श्रेष्ठ समीक्षकाचे २५ जानेवारी २०१५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -