घरसंपादकीयदिन विशेषभारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे

भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे

Subscribe

विष्णुपंत मोरेश्वर छत्रे यांचा आज स्मृतिदिन. विष्णुपंत छत्रे हे भारतीय सर्कसचे जनक होते. त्यांचा जन्म १८४० मध्ये सांगलीतील बसणी येथे झाला. विष्णुपंत शाळेत फारसे रमले नाहीत. सवंगड्यांबरोबर हुंदडण्यात आणि कुत्री, माकडे, ससे, कबुतरे यांच्यात ते रमून जात. जमखिंडीकर पटवर्धन संस्थानिकांच्या घोड्यांच्या पागेत, घोड्यावर स्वार होऊन घोडदौड करायला ते शिकले.

दररोजच्या कसरतीमुळे काटक व पिळदार बनलेली शरीरयष्टी, घौडदौडीतील चपळाई आणि धाडस करण्याची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे नशीब आजमावयाला ते ग्वाल्हेरला गेले. तेथे घोड्यांच्या कसरतीत त्यांनी अथक मेहनत घेऊन प्रावीण्य मिळवले. सुमारे ८ ते १० वर्षांच्या या कालावधीत श्रीमंत बाबासाहेब आपटे यांचे ते पट्टशिष्य बनले आणि महाराष्ट्रात परतले. इंदूर, विंचूर, कुरुंदवाड, जव्हार अशा अनेक संस्थानांत ते घोड्यांना चाल आणि कवायतीचे शिक्षण देऊ लागले.

- Advertisement -

मुंबईत बोरीबंदर येथे चर्नी विल्सनची ‘हर्मिस्टन सर्कस’ चालू होती, मात्र छत्र्यांच्या ‘ग्रँड इंडियन सर्कस’ला तुफान प्रतिसाद मिळाला. कुरुंदवाडच्या संस्थानिकांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि त्यातूनच भारतीय सर्कसचा पाया रचला जाऊ लागला. विष्णुपंतांनी तरुण कलाकार आणि तेजदार घोडे घेऊन कुरुंदवाड येथे सर्कशीची तालीम सुरू केली आणि अवघ्या ८-१० महिन्यांत सर्कस मूर्त स्वरूपात आणली.

त्या सर्कशीला ‘ग्रँड इंडियन सर्कस’ हे नाव दिले. छत्र्यांच्या या पहिल्या भारतीय सर्कसने नवा इतिहास घडवला. विष्णुपंत छत्रे यांच्या या पहिल्या भारतीय सर्कशीत पाश्चात्यांचे कसलेही अनुकरण नव्हते, तर स्वतंत्र अशा भारतीय बाण्याने ती उभी होती. देशभक्ती हा जणू तिचा आत्माच होता. अशा या भारतीय सर्कसच्या जनकाचे २० फेब्रुवारी १९०५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -