घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये । ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ॥
त्याचप्रमाणे, चित्त लयाला गेले की, सर्व ब्रह्मच होते. या योगरूप सुखकर उपायाने असा मोठा लाभ होतो.
या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुतीं । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥
मनातील संकल्पविकल्प सोडून जे या सोप्या योगस्थितीचा खूप अनुभव घेऊन सुखी झाले,
तें सुखाचेनि सांगातें । आले परब्रह्मा आंतौतें । तेथ लवण जैसें जळातें । सांडूं नेणें ॥
ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्मपदाला येऊन पोहोचले. मीठ पाण्यात मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडू शकत नाही,
तैसें होय तिये मेळीं । मग सामरस्याचिया राउळीं । महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ॥
त्याप्रमाणे, जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य झाल्यावर त्याची स्थिति होते आणि नंतर ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी, सर्व जगास झाली आहे असे तो पाहतो.
ऐसें आपुले पायवरी । चालिजे आपुलें पाठीवरी । हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ॥
याप्रमाणे आपलेच पाय घेऊन आपले पाठीवर योगी चालतो. असा अवघड जो योग तो तुला घडत नसेल तर तुला आणखी दुसरा उपाय सांगतो.
तरी मी तंव सकळ देहीं । असे एथ विचारु नाहीं । आणि तैसेंचि माझ्या ठायीं । सकळ असे ॥
मी सर्वाच्या देहात आहे आणि माझ्या ठिकाणी सर्व आहे याविषयी तर वाद नाहीच.
हें ऐसेंचि संचलें । परस्परें मिसळलें । बुद्धी घेपे एतुलें । होआवें गा ॥
अशा रीतीने जग व ईश्वर ही एकमेकांत मिसळली आहेत; परंतु त्याप्रमाणे साधकाच्या बुद्धीने तसे स्वीकारले पाहिजे एवढेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -