घरमनोरंजन'लगान'ची 21 वर्षे! आमिर खानने स्टारकास्टसोबत केले जंगी सेलिब्रेशन

‘लगान’ची 21 वर्षे! आमिर खानने स्टारकास्टसोबत केले जंगी सेलिब्रेशन

Subscribe

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा लगान हा चित्रपट 15 जून 2001 रोजी रिलीज झाला होता. चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. आता या चित्रपटाला रिलीजला जवळपास 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही हा चित्रपटाला चाहत्यांची पसंती मिळते. 2001 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने 53 कोटींची कमाई केली. चित्रपटातील गाणी, कलाकारांचे अभियनाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ऑस्कर आणि अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या तीन भारतीय चित्रपटांपैकी हा एक होता.

अलीकडेच सुपरस्टार आमिर खानने ‘लगान: वन्स अपॉन ए टाइम’ची २१ वर्षे त्याच्या घरी मरिना येथे साजरी केली. या सोहळ्यासाठी चित्रपटातील नामवंत कलाकारही त्यांच्या घरी उपस्थित होते. आमिर खानच्या प्रॉडक्शनने ‘लगान’ टीमच्या इंटिमेट सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील ‘चले चलो’ हे गाणे वाजत असून संपूर्ण टीम एकत्र मस्ती करताना दिसत आहे.

- Advertisement -

आमिर खान आणि संपूर्ण टीमसाठी ‘लगान’ला भावनिक महत्त्व आहे. 2021 मध्ये महामारीच्या काळात, चित्रपटाच्या रिलीजला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्टारने वर्चुअल गैदरिंग केले होते. पण यावेळी दिग्दर्शकासह संपूर्ण स्टारकास्ट या एव्हरग्रीन चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले. आशुतोष गोवारीकरपासून ते अखिलेंद्र मिश्रा, ग्रेसी सिंग, यशपाल शर्मा, रघुवीर यादव, राजेश विवेक उपाध्याय, दया शंकर पांडे, राजेंद्रनाथ झुत्शी, राजा अवस्थी, सुहासिनी मुळे, प्रदीप रामसिंग रावत, अमीन गाझी यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, लगानला आतापर्यंत यश मिळत आहे. उद्योग वृत्तांनुसार, यूकेच्या अनेक आघाडीच्या निर्मात्यांनी आमिर खान प्रॉडक्शनला चित्रपटाच्या हक्कांसाठी विनंती केली आहे आणि वेस्ट एंड थिएटरबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. लगान ही 1893 मधील भारतातील ब्रिटीश साम्राज्याच्या व्हिक्‍टोरियन काळातील कथा आहे. आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आमिर खान प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे.


ऋतिक रोशनवर कोसळला दु:खाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -