घरताज्या घडामोडीHashtag Prem: सुयश म्हणतोय थोडा थोडा विचारात आहे मी तुझ्या...!

Hashtag Prem: सुयश म्हणतोय थोडा थोडा विचारात आहे मी तुझ्या…!

Subscribe

अभिनेता सुयश टिळक #हॅशटॅग प्रेम म्हणत नवी कोरी सिंपल लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या सिनेमातून अभिनेत्री मिताली मयेकर आणि सुयश टिळकची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सुयशने माय महानगरशी मारलेल्या गप्पा आणि सुयशसाठी प्रेम म्हणजे नक्की काय हे त्याच्या कडून जाणून घ्या.

  • हॅशटॅग प्रेम या सिनेमाविषयी काय सांगशील?

आम्हाला सगळ्यांनाच सिनेमाची खूप उत्सुकता आहे कारण सिनेमा खूप काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाने अनेक अडचणी पाहिल्या आणि  शेवटी दोन तीन वर्षां प्रतिक्षेनंतर सिनेमा प्रदर्शित होतेय आणि प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. थोडी वेगळी लव्ह स्टोरी आणि साधी गोष्ट आहे. मलाही अशा साध्या सिंपल स्टोरी पाहायला आवडतात .मला खात्री आहे प्रेक्षकांना देखील ही स्टोरी नक्कीच आवडेल.

- Advertisement -
  • लाकडाऊन नंतर काम करताना खूप दिवसांनी प्रेक्षकांसमोर येताना कसं वाटतय?

माझ्यासाठी खूपच गमतीशीर आहे कारण या सिनेमात मी पहिल्यांदा मुख्य नायकाची भूमिका करतोय. मी आजपर्यंत अशा सिनेमात काम केलेलं नाहीये त्यामुळे मला एक वेगळी गंमत वाटतेय . मोठ्या पडद्यावर  सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे. मला अस वाटत की, याआधी प्रदर्शित झालेल्या सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळातोय तिचं पॉझिटीव्हीटी घेऊन प्रेक्षकांनी या सिनेमाला सुद्धा गर्दी करावी.

  •  मिताली मयेकर सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

मिताली आणि मी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र काम केलय. मिताली खूप फ्रेश आणि व्हायब्रंट अभिनेत्री आहे. तिच्या सोबत काम करताना खूप मजा आली.अनेक गमतीजमती झाल्या, अनेक किस्से घडले. कारण संपूर्ण सिनेमात प्रवास आहे. त्यामुळे जास्तीत वेळ आम्ही एकत्र होतो. त्यामुळे ज्या गोष्टी युनिटला माहिती नाही अशा गोष्टी आम्हाला माहिती आहेत. मिताली बद्दल म्हणायचं झालं तर तिने सिनेमातील व्यक्तिरेखेला योग्य तो न्याय दिला आहे.

- Advertisement -
  • सुयश टिळकसाठी प्रेम म्हणजे नक्की काय आहे?

मला अस वाटत प्रेम हे कुठलीही अपेक्षा घेऊन येत नाही. माझा पूर्ण विश्वास प्रेम या संकल्पनेवर आहे. ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम असत त्या व्यक्तीचंही तुमच्या वर प्रेम असेलच अस नाही त्यामुळे तुम्ही बिनशर्त प्रेम करायला शिकल पाहिजे.

  • तुझी लग्नानंतरचा पहिला सिनेमा आहे तर आयुषीसाठी सिनेमातील कोणता डायलॉग किंवा गाणं म्हणशील? 

आयुषीसाठी ‘थोडा थोडा विचारात आहे मी आहे तुझ्या’ हे गाण मी तिला डेडिकेट करेन. सिनेमातील गाणी आणि डायलॉग तुम्हालाही आवडतील. डायलॉगची गंमत म्हणता येईल की, लोकल भाषा वेगवेगळी शिकून आम्ही ती या सिनेमात आणण्याचा प्रयत्न केला आहे.


हेही वाचा – स्वीटू म्हणतेय मला प्रेमाचा अनुभवच नाही…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -