स्वीटू म्हणतेय मला प्रेमाचा अनुभवच नाही…

अभिनेत्री अन्विता फलटणकरने माय महानगरशी मारलेल्या दिलखुलास गप्पा

yeu kashi tashi mi nandayla fem sweetu anvita phaltankar special interview
yeu kashi tashi mi nandayla fem sweetu anvita phaltankar special interview

येऊ कशी कशी मी नांदायला मधली स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकर सांगतेय सेटवरची मजा आणि तिच्या रिअल व रील लाईफ बद्दल

  • अन्विता म्हणून स्वीटूकडे कशी बघतेस?

स्वीटू आणि अन्विता खूप वेगळ्या आहेत. लहानपणापासून माझ आणि स्वीटूच संगोपन वेगळ आहे, तिच्या परिस्थिती मधल्या मुलीला समजून घेणे माझ्यासाठी खूप कठीण होत. अन्विता खूप बडबडी आहे ती पटकन बोलून मोकळी होते  पण स्वीटू तशी नाहीये ती खूप समंजसपणे वागणारी आहे. शिवाय मला प्रेमात पडण्याचा काहीही अनुभव नाहीये.

  • मोहित आणि स्वीटूच लग्न झाल तेव्हा खूप ट्रोलिंग झालं तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहून कामाकडे कसं लक्ष देता?

मालिका जेव्हा प्रेक्षक बघतात तेव्हा त्यांनी त्यात गुंतणे  हीच आमची पावती असते. मग एखादी गोष्ट त्यांना नाही आवडली तर त्यांनी ट्रोल केल तर त्यात चुकीच काही नाही कारण ते त्यात इतके गुंततात आणि त्यांना ती पात्र आपलीशी वाटतात.

  • इन्स्टाग्रामवर तुझं फॅन फॉलोविंग खूप आहे  ते प्रेम पाहून कसं वाटत?

मी खूप सोशल लाईफ जगणारी मुलगी आहे.  मित्र मैत्रिणी सोबत बाहेर फिरण मला खूप आवडत त्यामुळे मी काही जी मजा मस्ती करते चे फोटोज शेअर करत असते.

  • अन्विताने स्वीटू साकारायलाच हवी असा कुठला ट्रिगर पॉइंट वाटला?

एक मोठी भूमिका साकारण एकतर माझ्यासाठी मोठ आव्हान होतं कारण छोट्या छोट्या भूमिका करण सोप असत पण एक मोठी भूमिका करण खरच जबाबदारीचं काम आहे.


हेही वाचा –  Balika Vadhu 2: मोठ्या आनंदीच्या भूमिकेत दिसू शकते ‘ही’ अभिनेत्री