घरमनोरंजन'आदिपुरुष'चा नवा रेकॉर्ड तीन दिवसांत कमावले 300 कोटी

‘आदिपुरुष’चा नवा रेकॉर्ड तीन दिवसांत कमावले 300 कोटी

Subscribe

सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान आणि कृती सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस उलटले आहेत. या चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. मात्र, रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाला अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. नुकतेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, या दोन दिवसांत चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवरून एकूण 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘आदिपुरुष’ने कमावले 300 कोटी

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तब्बल 140 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 100 कोटी कमावले. तसेच तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 64 कोटी कमावले आहेत. त्यामुळे चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत 300 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘आदिपुरुष’ने हिंदी बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत जवळपास 61.5 कोटी कमावले आहेत.

600 कोटीमध्ये तयार झाला चित्रपट

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 600 कोटी खर्च करण्यात आले. या चित्रपटाचे प्रमोशन देखील जोरदार करण्यात आलं होतं. चित्रपटाची वाढती कमाई पाहून लवकर 600 कोटीचा आकडा पार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

चित्रपटातील संवाद बदलले जाणार

‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये असलेले संवाद हे रामायण काळातील वाटत नसून छपरी वाटत होते. त्याबद्दल उसळलेला जनक्षोभ बघून आदिपुरुषचे निर्माता निर्देशक यांनी आदिपुरुषचे डायलॉग बदलण्याचे विचार जाहीर केले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आदिपुरुषचे संवाद हे सौम्य आणि सोज्वळ भाषेमध्ये ऐकायला येणार आहेत. लेखक मनोज मुंतशिर शुक्ला यांनी आदिपुरुषचे संवाद लिहिले असून, त्या संवादावरून बराच गदारोळ उठला होता.

 


हेही वाचा :

करण देओलच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-दीपिकाच्या लूकने वेधलं चाहत्यांच लक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -