घरमनोरंजनकरण देओलच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-दीपिकाच्या लूकने वेधलं चाहत्यांच लक्ष

करण देओलच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-दीपिकाच्या लूकने वेधलं चाहत्यांच लक्ष

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल आणि द्रिशा 18 जून (काल) रोजी विवाह बंधनात अडकले. करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करण देओलचा लग्नसोहळा लग्न मुंबईतील Taj Lands या 5 स्टार हॉटेलमध्ये झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नानंतर संध्याकाळी करण आणि द्रिशाचे रिसेप्शन देखील पार पडले. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. सध्या या कलाकारांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रणवीर-दीपिकाच्या लूकने वेधलं चाहत्यांच लक्ष

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण देखील या ग्रँड रिशेप्शन पार्टीमध्ये उपस्थित राहिले होते. यादरम्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यावेळी दीपिकाने काळ्या रंगाचा सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला होता. तर रणवीर सिंहने पांढऱ्या रंगाचा ट्रेडिशनल आउटफिट केला होता. दोघेही या लूकमध्ये सुंदर दिसत होते.

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये दीपिका आणि रणवीर हातात हात घालून जाताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये दोघं डान्स करताना दिसत आहेत. दोघांचे हे फोटो पाहून मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे.

दरम्यान, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटामुळे दीपिका चर्चेत होती. आगामी काळात दीपिका फायटर या चित्रपटात दिसणार आहे. तर रणवीर सिंह ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे.


हेही वाचा :

तू माझा आज आणि उद्याही… करणने शेअर केली द्रिशासाठी खास पोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -