घरमनोरंजनआदित्य रॉय कपूरच्या 'ओम' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

आदित्य रॉय कपूरच्या ‘ओम’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Subscribe

आदित्य रॉयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा टीझर शेअर केला असून त्याखाली त्याने एक कॅप्शन दिलं आहे. 'एक लढाई जिंकण्यासाठी त्याला अनेकवेळा लढावे लागते.'

बॉलिवूडचा अभिनेता आदित्य रॉय कपूरचा ‘ओम’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या महिन्यात या चित्रपटाच्या फर्स्ट लूक रिलीज झाला होता. नुकताच या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले असून या टीझरला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे.या 57 मिनिटांच्या टीझरमध्ये एक माणुस सुरूवातीला ‘मी कोण आहे? मला काहीच आठवत नाही. तेवढ्यात एक लहान मुल पप्पा अशी हाक मारते, त्यावर एक म्हातारा माणूस ऋषी पळ, पळ’असं म्हणतो. आदित्य रॉयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा टीझर शेअर केला असून त्याखाली त्याने एक कॅप्शन दिलं आहे. ‘एक लढाई जिंकण्यासाठी त्याला अनेकवेळा लढावे लागते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by @adityaroykapur

- Advertisement -

या चित्रपटामध्ये आदित्य रॉयबरोबर अभिनेत्री संजना सांघवी सुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येईल. ‘ओम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कपिल वर्मा यांनी केले असून अहमद खान, शेरा खान आणि झी स्टूडिओज ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘ओम’ हा चित्रपट एक अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट आहे. १ जून २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय आदित्या रॉयचा ‘व्हिलन २’ हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 

 

‘अवतार’ चित्रपटाचा दुसरा सिक्वेल लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -