घरताज्या घडामोडीबनावट विक्री योजनेद्वारे हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक, आरोपीला अटक करण्याची संजय कुटेंची...

बनावट विक्री योजनेद्वारे हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक, आरोपीला अटक करण्याची संजय कुटेंची मागणी

Subscribe

राज्यातील महिलांची बनावट विक्री योजनेद्वारे कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप भाजप आमदार संजय कुटे यांनी आरोप केला आहे. तसेच फरार आरोपीला तातडीने अटक करण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली आहे. फसवणूक झालेल्या महिलांना न्याय मिळाल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही असा निर्धार संजय कुटे यांनी केला आहे. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनासुद्धा निवेदन देण्यात आले आहे.

महिला गृहउद्योगाच्या नावाखाली राज्यभरातील हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक झाली असून या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी करावी व या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अजित हिवरे याला तातडीने अटक करावी अशी मागणी भाजप आमदार संजय कुटे यांनी केला आहे. अजित हिवरे यांनी राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत महिलांना स्वयंरोजगार देण्याचा व्यवसाय सुरु केला. मसाले पॅकिंग मशीन , बटन तयार करणारी मशीन , आटा मशीन याची विक्री मल्टी लेव्हल मार्केटिंग पद्धतीने करण्यासाठी सुमारे २६ जिल्ह्यांत या कंपनीच्या शाखा उघडल्या. जिल्ह्याजिल्ह्यात महिला डेव्हलपमेंट ऑफिसर नेमून व्यवसाय सुरु केला.

- Advertisement -

प्रत्येक मशीनची किंमत ११ ते १५ हजार रु. दरम्यान ठेवण्यात आली. या मशीनद्वारे निर्माण केलेला माल कंपनीकडून खरेदी करण्याचे आश्वासनही देण्यात आले. सुरुवातीला २-३ महिने महिलांनी खरेदी केलेल्या मशीनच्या मार्फत तयार झालेल्या वस्तू कंपनीने खरेदीही केल्या. त्यानंतर मात्र कंपनीकडून वस्तू खरेदी बंद झाली. आता तर कंपनीचे पुण्यातील कार्यालय बंद करण्यात आले असून कंपनीचा मालक हिवरे हा फरार झाला आहे. व्यवसाय वाढीसाठी अकोला , बुलडाणा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत सत्ताधारी राष्ट्रवादी नेत्यांच्या नावाचा वापर केला गेला असल्याचे उघड झाले आहे, असे कुटे यांनी सांगितले आहे.

हजारो महिलांनी ११ हजार रु . भरून मशीन खरेदी केल्या आहेत. आपली फसवणूक झाल्यावर अनेक ठिकाणी महिलांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणूक झालेल्या महिलांनी आपल्या गावातील भाजप पदाधिकाऱ्यांशी , लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून पोलिसांकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन संजय कुटे यांनी केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राजद्रोहाच्या कलमाचा चुकीचा वापर, कलम रद्दच करा, शरद पवारांचा सरकारला सल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -