घरमनोरंजन'अवतार' चित्रपटाचा दुसरा सिक्वेल लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘अवतार’ चित्रपटाचा दुसरा सिक्वेल लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा दुसरा सिक्वेल बनवण्याची घोषणा याआधीच केली होती. त्यामुळेच प्रेक्षक अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते.

 

२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’ चित्रपटाचा आता येत्या काळात दुसरा सिक्वेल येणार आहे. २००९ साली या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला चांगली भुरळ पाडली होती. एका सामान्य कथेच्या आधारावर फक्त व्हिज्युअल इफेक्ट्सचा आधार घेऊन ‘अवतार’ चित्रपटाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा दुसरा सिक्वेल बनवण्याची घोषणा याआधीच केली होती. त्यामुळेच प्रेक्षक अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटाच्या नावाची आणि ट्रेलरची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

जवळपास १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या चित्रपटाच्या ट्रेलरची घोषणा झालेली आहे. त्यामुळे जगभरातील प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. जेम्स कॅमेरून यांच्या अवतार चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलचे नाव ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ असे नाव देण्यात आले आहे.

- Advertisement -

या चित्रपटाबाबत जेम्स कॅमेरून यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर घोषणा केली. ते म्हणाले की, या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर येत्या काळात प्रदर्शित होईल. हा ‘टीझर ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ सोबत दाखवण्यात येईल.
‘टीझर ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा हॉलिवूड चित्रपट ६ मे २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार’ हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास १३ वर्षांनी ‘अवतार’ चा दुसरा सिक्वेल ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. १६ मे २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

 

 

Heropanti 2 : चित्रपट रिलीज होण्याआधी टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाने दिली धार्मिक स्थळांना भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -