घरताज्या घडामोडीतब्बल 12 वर्षांच्या अंतरानंतर Suniel Shetty-Sanjay Dutt यांची दमदार जोडी येतेय प्रेक्षकांच्या...

तब्बल 12 वर्षांच्या अंतरानंतर Suniel Shetty-Sanjay Dutt यांची दमदार जोडी येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

बॉलीवूडची सुपरहिट जोडी अभिनेता सुनील शेट्टी आणि अभिनेता संजय दत्त बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर दोघेही एकत्र स्क्रीनवर दिसणार आहेत. सुनील शेट्टी आणि संजय दत्त हे रीअल लाइफमधील सर्वोत्तम सहकलाकार आहेत. हे दोघेही खऱ्या आयुष्यातही तितकेच जवळचे मित्र आहेत.

बॉलीवूडची सुपरहिट जोडी अभिनेता सुनील शेट्टी आणि अभिनेता संजय दत्त बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर दोघेही एकत्र स्क्रीनवर दिसणार आहेत. सुनील शेट्टी आणि संजय दत्त हे रीअल लाइफमधील सर्वोत्तम सहकलाकार आहेत. हे दोघेही खऱ्या आयुष्यातही तितकेच जवळचे मित्र आहेत. या दोघांना पुन्हा एकत्र पाहणे चाहत्यांसाठी फार आनंदाचा क्षण असणार आहे. ही एकेकाळची लोकप्रिय जोडी असून, मोठा पडदा गाजवलेले दोन मोठे अभिनेते आता पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

- Advertisement -

‘कांटे’ आणि ‘दस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपण सुनील शेट्टी आणि संजू बाबा यांचा अप्रतिम अभिनय पाहिला आहे.संजय (Sanjay Dutt) आणि सुनील (Sunil Shetty) शेवटचे 2010 मध्ये आलेल्या ‘नो प्रॉब्लेम’ चित्रपटात एकत्र दिसले होते. बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना मोठ्या पडद्यावर या जोडीची उणीव भासत होती. समीर कर्णिक दिग्दर्शित कॉमेडी चित्रपटात हे दोन्ही स्टार्स सर्वांना हसवताना दिसणार आहेत. याचा खुलासा खुद्द सुनील शेट्टीने केला आहे. लवकरच या दोघांच्या नव्या सिनेमाची घोषणा होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

- Advertisement -

केजीएफ 2 मध्ये संजय दत्त विलनच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सुनिल शेट्टीचाही ‘मराक्कर’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. खरा बॉन्ड सुनील शेट्टीने सांगितले की, या चित्रपटात त्याचे आणि संजय दत्तचे खरे बंध पाहायला मिळणार आहेत. जसे की ते वास्तविक जीवनात विनोद करतात.यापूर्वी सुनील शेट्टी आणि संजय दत्तची जोडी अनेक अॅक्शन चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना दिसली होती. मात्र, आता हे दोघेही कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


हे ही वाचा – हृतिक रोशनच्या हातात-हात घालून फिरणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -