घरताज्या घडामोडी'Pushpa'च्या भरघोस यशानंतर Allu Arjun आपल्या दुसऱ्या फिल्मचे हिंदी व्हर्जन चित्रपटगृहात रिलीज...

‘Pushpa’च्या भरघोस यशानंतर Allu Arjun आपल्या दुसऱ्या फिल्मचे हिंदी व्हर्जन चित्रपटगृहात रिलीज करणार

Subscribe

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' या चित्रपटाला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळतं आहे. हा चित्रपट जगभरात सर्वांत हिट चित्रपट म्हणून ओळखला गेला आहे. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्नाने या चित्रपटात काम केले आहे. पुष्पाच्या भरघोस यशानंतर आता 'अला वैकुंठापुरमुलु' च्या निर्मात्यांनी एक निर्णय घेतला आहे.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. हा चित्रपट जगभरात सर्वांत हिट चित्रपट म्हणून ओळखला गेला आहे. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्नाने या चित्रपटात काम केले आहे. पुष्पाच्या भरघोस यशानंतर आता ‘अला वैकुंठापुरमुलु’ च्या निर्मात्यांनी एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘अला वैकुंठापुरमुलु’ सिनेमाचे हिंदी व्हर्जन 26 जानेवारीला चित्रपटगृहात रिलीज करण्यात येणार आहे.

त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठापुरमुलु ‘ चित्रपट 2020 मध्ये थिएटरमध्ये दाखल झाला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. ‘अला वैकुंठापुरमुलु ‘ चे एकूण कलेक्शन सुमारे 160 कोटींचे आहे. हा चित्रपट 2020 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक सिनेमा आहेय. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा सिनेमा जबरदस्त हिट ठरला आहे, त्यामुळे निर्माते ‘अला वैकुंठापुरमुलु’ हिंदीत रिलीज करण्याचा विचार करत आहेत. या सिनेमालाही त्याच प्रकारचा दर्जा मिळावा अशी निर्मात्यांची आशा आहे.

- Advertisement -

‘अला वैकुंठापुरमुलु ‘ हा सिनेमा एक कमर्शिअल एंटटेनमेंट आहे ज्यामध्ये अल्लू अर्जुन, पूजा हेगडे आणि समुथिराकनी मुख्य भूमिकेत आहेत. त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित या चित्रपटात तब्बू, जयराम, सुशांत, निवेथा पेथुराज, नवदीप आणि राहुल रामकृष्ण यांनीही या सिनेमात प्रमुख भूमिका बजावली आहे.पुष्पाच्या हिंदी व्हर्जनने एका महिन्यात 84.75 कोटी रुपये कमावले. त्याचबरोबर या चित्रपटाने परदेशात 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एन. डी. पाटील अन् माझ्यात मतभेद, पण त्यांच्या विचारधारेशी ते प्रामाणिक- शरद पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -