घरमनोरंजन#Good Newwz: धम्माल ट्रेलर आऊट!

#Good Newwz: धम्माल ट्रेलर आऊट!

Subscribe

धर्मा प्रोडक्शनचा आगामी चित्रपट गुड न्यूजचे ट्रेलर लाँच झाले असून पुन्हा एकदा रॉम-कॉम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार, करिना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजीत ही स्टारकास्ट चित्रपटात पाहायला मिळणार आहे. संतान होण्यासाठी आसुसलेल्या दोन जोडप्यांची ही गोष्ट आहे. अक्षय-करिना आणि कियारा-दिलजीत या दोन कपल्सना बाळ होण्यासाठी कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते याचे प्रत्यय चित्रपटाचे ट्रेलर पाहिल्यावर येते. आजच्या आधुनिक युगात गर्भाधारणा होण्याकरता अनेकदा मेडिकल सायन्सचा आधार घ्यावा लागतो. यातील सर्रास वापरला जाणार एक उपाय म्हणजे आयव्हीएफ. गर्भधारणेसाठी आयव्हीएफची मदत घेणाऱ्या या जोडप्यांचे आयुष्य पुढे कसे होते, ही गोष्ट प्रेक्षकांना गुड न्यूजमध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या २७ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -