घरमनोरंजनआलिया बनली 'पोचर'ची निर्माती

आलिया बनली ‘पोचर’ची निर्माती

Subscribe

अभिनेत्री आलिया भट्ट ही गुन्हेगारी विषयावर असलेल्या ‘पोचर’ या अमेझॉन ओरिजनल मालिकेची कार्यकारी निर्माती बनली आहे. एम्मी-पुरस्कार चित्रपट निर्माते रिची मेहता आणि ‘क्यूसी एंटरटेनमेंट’ यांनी ही मालिका तयार केली आहे. सत्य घटनांवर आधारित तपास गुन्ह्यांची ही मालिका असणार आहे. यात भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या हस्तिदंत शिकार करणाऱ्या टोळीचा शोध घेतला जातो. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून, अवैध शिकारीची समस्या जी जगाला भेडसावत आहे, त्यावर प्रकाशझोत टाकण्याच्या उद्देशाने या मालिकेद्वारे पर्यावरण संवर्धन आणि रंजनाच्या जगताला एकत्र आणले जात आहे.

एम्मी- पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते रिची मेहता यांनी ही मालिका तयार केली असून लिखाण आणि दिग्दर्शनही त्यांचेच आहे. या मालिकेत निमिषा सजयन, रोशन मॅथ्यू आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांच्या प्रमुख भूमिकांसह विविध प्रतिभावान कलाकार आहेत. ‘पोचर’ ही मालिका मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी ही मालिका जगभरातील २४० हून अधिक देशांत प्रसारित केली जाणार आहे. ही मालिका केवळ ‘प्राइम व्हिडिओ’वर प्रदर्शित होईल.

- Advertisement -

जागतिक स्तरावर नावाजली जाणारी कलाकार -आलिया भट्ट निसर्ग संवर्धनाची सक्रिय समर्थक म्हणून ओळखली जाते. आलिया पर्यावरण संरक्षण व शाश्वत निसर्गाची सक्रिय पुरस्कर्ती आहे. ‘पोचेर’ची निर्मिती करणारी कंपनी ‘इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन’सह एक कार्यकारी निर्माती म्हणून या मालिकेशी आलिया जोडली गेली आहे.

‘पोचर’ मालिकेची कार्यकारी निर्माती म्हणून सहभागी होण्यासंदर्भात आलिया भट्ट म्हणाली, “माझ्याकरता आणि ‘इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन्स’च्या संपूर्ण टीमसाठी अशक्य कोटीतला ठरेल, अशा या महत्त्वाच्या प्रकल्पाचा एक भाग असणे ही माझ्याकरता सन्मानाची गोष्ट आहे. ‘पोचर’ मालिकेचा प्रभाव अत्यंत वैयक्तिक होता आणि वन्यजीव गुन्हेगारीच्या या घटनांवर तातडीने लक्ष पुरवले जायला हवे, अशा या गंभीर समस्येचे रिचीने जे चित्रण केले आहे, त्याचा माझ्यावर आणि टीमवर खोलवर परिणाम झाला. कथा कथनाने मला खरोखरच प्रभावित केले, विशेषतः ही कथा सत्य घटनांवर आधारित आहे हे लक्षात घेता, ही कथा आपल्या जंगलांमध्ये घडणाऱ्या क्रूर गुन्ह्यांवर प्रकाशझोत टाकते. मला विश्वास आहे की, ‘पोचर’ ही एक डोळे उघडणारी वन्यजीव कथा म्हणून काम करेल. सर्व सजीवांप्रती अधिक सहानुभूतीचा आणि संवेदनशीलतेचा संदेश देईल. सह-अस्तित्व स्वीकारण्यासाठी करण्यात आलेले हे आवाहन आहे आणि रिची, क्यूसी आणि ‘प्राइम व्हिडिओ’च्या सहयोगाने या कथनात योगदान देण्याकरता मी खरोखरच उत्साही आहे.”

- Advertisement -

‘पोचर’ची निर्मिती ‘क्यूसी एंटरटेनमेन्ट’च्या एडवर्ड एच. हॅम ज्युनियर, रेमंड मॅन्सफील्ड आणि सीन मॅककिट्रिक यांनी सुटेबल पिक्चर्स, पुअर मॅन प्रॉडक्शन्स आणि इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे. ॲलन मॅकलेक्स (सुटेबल बॉय) ‘सुटेबल पिक्चर्स’करता निर्माता म्हणून काम करत आहे. ‘दिल्ली क्राइम’मधील छायाचित्रणाचे संचालक जोहान एड्ट, संगीतकार अँड्र्यू लॉकिंग्टन आणि संपादक बेव्हर्ली मिल्स यांचाही समावेश आहे. सिनेमा क्षेत्रातील तिच्या प्रयत्नांव्यतिरिक्त, आलियाने तिच्या ‘कोएक्झिस्ट’ या व्यासपीठाद्वारे पर्यावरणीय शाश्वतता, प्राणी कल्याण आणि मानव-प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याकरता मदत केली आहे.

 

 

 


हेही वाचा;  Juhi Chawla : आमिर इतकं ‘चीप’ गिफ्ट देऊ शकतो… जुही चावला काय बोलून गेली?

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -