घरक्रीडाTeam India: T-20 विश्वचषकानंतर भारतीय संघ खेळणार मोठी मालिका; BCCIने जाहीर केलं...

Team India: T-20 विश्वचषकानंतर भारतीय संघ खेळणार मोठी मालिका; BCCIने जाहीर केलं शेड्यूल

Subscribe

T-20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघासाठी यंदाची सर्वात मोठी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत या वर्षी जूनमध्ये टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहते या स्पर्धेची वाट पाहत आहेत. हा T-20 विश्वचषक जिंकून भारताला एकदिवसीय विश्वचषक न जिंकल्याची उणीव भरून काढायला हवी, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने टी-20 विश्वचषकानंतरचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. T-20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. (Team India Team India will play a big series after the T 20 World Cup BCCI announced full schedule)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी झिम्बाब्वेसोबतच्या आगामी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. ही टी-20 मालिका असेल, त्यातील सर्व सामने हरारे येथे 6 ते 14 जुलै दरम्यान खेळवले जातील. बीसीसीआयने मात्र भारतीय संघाबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. मात्र या मालिकेत भारत आपल्या युवा खेळाडूंना संधी देईल, असे मानले जात आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्याची शक्यता नाही.

- Advertisement -

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, जागतिक क्रिकेटच्या वाढीसाठी बीसीसीआयने नेहमीच योगदान दिले आहे. आम्हाला माहित आहे की, झिम्बाब्वे क्रिकेटला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आमच्या मदतीची गरज आहे. झिम्बाब्वेसोबतची ही मालिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे.

T-20 वर्ल्ड कप यावर्षी 1 जून ते 29 जून दरम्यान खेळवला जाईल. या T-20 विश्वचषकाचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका करणार आहेत. अमेरिकेत क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटचा विश्वचषक पहिल्यांदाच खेळवला जाणार आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: नयना जयस्वालने रचला इतिहास ; २२ व्या वर्षी मिळवली डॉक्टरेट पदवी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -