घरमनोरंजनअनुष्का शर्माच्या नव्या शॉर्ट हेअर लूकवर चाहते घायाळ, आलिया भट्ट्नेही केली कमेंट

अनुष्का शर्माच्या नव्या शॉर्ट हेअर लूकवर चाहते घायाळ, आलिया भट्ट्नेही केली कमेंट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अनेकांसाठी एक फॅशन आयकॉन आहे. तिच्या हेअरस्टाईल देखील चाहत्यांमध्ये जोरदार लोकप्रिय आहेत. नुकताच अनुष्काने तिच्या नव्या हेअरस्टाईलमधील एक फोटो शेअर केला आहे. या लूकमध्ये अनुष्काने शॉर्ट हेअर केल्याचे दिसतेय. अनुष्का शर्माचा हा नवा शॉर्ट हेअर लूक चाहत्यांनाही खूप आवडलाय. अनुष्काने या शॉर्ट हेअर लुकमधील एका क्लोजअप फोटो चाहत्यांसाठी शेअर केला असून ज्यात ती हसऱ्यामुळे कमाल दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

- Advertisement -

अनुष्का शर्माचा हा नवा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय, नीति मोहन, धनश्रीसह अनेक बॉलिवूड सेलेब्स आणि फॅन्स तिच्या लूकची स्तुती करतायत. अभिनेत्री आलिया भट्टने देखील अनुष्काच्या लुकवर हार्टची इमोजी दिली आहे. आलियाने अनुष्काची स्तुती करत लिहिले की, Gorgeous. तिच्या या फोटोवर आता ४ लाखांहून अधिक लाईक्सचा पूर आलाय.

‘या’ कारणासाठी अनुष्काने केले हेअर शॉर्ट

अनुष्काने शर्माने ११ जानेवारी २०२१ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर जूनमध्ये तिने आपला नवा हेअरकट चाहत्यांसमोर आणत डिलीव्हरीनंतर तिला केस गळतीची समस्या जाणवू लागल्याचे तिने सांगितले.

- Advertisement -

पती विराटसह लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये दिसली अनुष्का

शॉर्ट हेअर लुकमध्ये अनुष्काने पांढऱ्या रंगाचा स्वेटर परिधान केला आहे. इंग्लंडविरोधात टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष करताना पती विराट कोहलीसह एका रेस्टॉरंटमध्ये दिसली. लंडनमधील टेंड्रिल रेस्टॉरंटमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंच करत होते. या रेस्टॉरंटच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे काही फोटो शेअर करण्यात आले आहे.


तालिबान्यांमध्ये २० वर्षानंतरही काहीच बदल नाही, कंदाहर अपहर घटनेचे साक्षीदार कॅप्टन देवी शरण यांचा अनुभव

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -