घरदेश-विदेशतालिबान्यांमध्ये २० वर्षानंतरही काहीच बदल नाही, कंदाहर अपहर घटनेचे साक्षीदार कॅप्टन देवी...

तालिबान्यांमध्ये २० वर्षानंतरही काहीच बदल नाही, कंदाहर अपहर घटनेचे साक्षीदार कॅप्टन देवी शरण यांचा अनुभव

Subscribe

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालिबानच्या हुकुमशाही राजवटीत जगण्यापेक्षा जिवाची पर्वा न करता येथील नागरिकांची देश सोडण्य़ासाठी धडपड सुरु आहे. जगातील विविध देशांकडून अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशातच आज तालिबानने काबून विमानतळावरून काही प्रवशांचं अपहरण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये काही भारतीयांचाही समावेश आसल्याचं सांगण्यात येत आहे. काबूलमधील हामीद करजई इंटरनॅशनल एअरपोर्टरजवळूनच या नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. एकंदरीत अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर जातेय. यावर जागतिक संघटनांकडूनही चिंता व्यक्त केली जातेय.

- Advertisement -

अशातच १९९९ साली अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावरून तालिबान्यांनी अपहरण केलेल्या विमानाचे कॅप्टन देवी शरण यांचे नवे विधान समोर आले आहे. अफगाणिस्तानातील कंदाहरमधून तालिबान्यांनी आयसी ८१४ विमानाचे अपहर केले होते. या घटनेचे कॅप्टन देवी शरण साक्षीदार आहेत. या अनुभवावरून त्यांनी आजच्या तालिबान्यांच्या स्थितीवर भाष्य केलं आहे. अफगाणिनची परिस्थिती पाहता २० पूर्वीची तालिबानी आजही त्याच मानसिकतेत जगत असल्याचे दिसतेय. असे देवी शरण म्हणाले. त्यामुळे २० वर्षापूर्वीच्या आणि आत्ताच्या तालिबान्यांमध्ये काहीच फरक नाही हे दिसतेय. फरक फक्त एक असू शकतो की, त्यावेळी आमचे विमान अपहरण करणारे तालिबानी तेवढे शिक्षित नव्हते, परंतु आत्ता थोडं शिक्षित असू शकतात. सध्या टिव्हीत दाखवत असलेली दृश्ये २० वर्षापूर्वीच्या तालिबानी राजवटीप्रमाणेच आहेत.
असेही कॅप्टन देवी शरण म्हणाले.

तलिबान्यांचे वर्चस्वासाठी सुरु असलेले क्रुर, अमानवी प्रयत्नांनावर देवी शरण सांगतात की, ज्या परिस्थितीचा सामना आम्ही २० वर्षापूर्वी केला. त्यावरून पुढील भविष्य कसे असेल हे सांगणे कठीण आहे. परंतु कंदहारमध्ये आम्ही खरचं खूप वाईट आणि क्रुर वेळेचा सामना केला. आजही तालिबान्यांचे व्हायरल व्हिडिओ पाहून २० वर्षापूर्वीचे दिवस पुन्हा आलेल्याचे वाटतेय. हे तालिबानी कंदहारमध्ये रॉकेट लॉन्चर मोकळ्या रस्त्यांवर घेऊन फिरतायं.

- Advertisement -

जगभरातील देश अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. या परिस्थितीतून नागरिकांना बाहेर काढणारे विविध प्लाईट क्रू मेंबर आणि कॅप्टनचे देवी शरण यांनी कौतुक केले. यावर कॅप्टन देवी शरण सांगतात की, सर्व क्रू मेंबर्स खूप चांगल्याप्रकारे काम करतायतं. अत्यंत वाईट परिस्थित ते विमान उड्डाण करतायतं. ही खरंच खुप कौतुकाची गोष्ट आहे. कारण या परिस्थितीतही ते विमान उड्डाण करतायत.

तालिबान्यांकडून अफगाणी नागरिकांची सुरु असलेली पिळवणुक, अत्याचार पाहता अनेक देशांनी अफगाणसोबतचे संबंध संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले, तर अमेरिका आणि जागतिक नाणेनिधी संघटनेने अफगाणच्या आर्थिक व्यवहारांवर बंधने आणलीत.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -