आलियाचा ‘धडक’साठी खास मेसेज

एका नव्या जोडीला घेऊन शंशाकने 'धडक'चे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा २० जुलैला रिलीज झाल्यानंतर लगेचच आलियाने या ट्विट करुन शशांकला शुभेच्छा दिल्या आहेत.

alia wishesh dhadak
आलियाने दिल्या 'धडक'ला शुभेच्छा

इशान खट्टर आणि जान्हवी कपूरचा मोस्ट अवेटेड ‘धडक’ हा सिनेमा या फिल्मी फ्रयडेला रिलीज झाला. सैराटचा रिमेक असल्यामुळे या सिनेमाकडून सगळ्यांचीच खूप अपेक्षा आहे. हा सिनेमा शशांक खैतानने दिग्दर्शित केला असून आलिया भटने त्याच्यासाठी एक खास मेसेज ट्विट केला आहे.

‘शंशाकसाठी आजचा दिवस मोठा’

हम्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया‘ या दोन्ही सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतानने केले होते. वरुण आणि आलिया या जोडीमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना या दोन्ही सिनेमात अधिक भावली. या दोन हिट सिनेमानंतर एका नव्या जोडीला घेऊन शंशाकने ‘धडक’चे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा २० जुलैला रिलीज झाल्यानंतर लगेचच आलियाने या ट्विट करुन शशांकला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय इशान आणि जान्हवी दोघांसाठी महत्चाचा दिवस असून त्यांना देखील शुभेच्छा असे तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आलिया सध्या काय करते?

आलियाच्या अभिनयातील विविध पैलू तिच्या सिनेमांमधून पाहायला मिळत आहे. ‘स्टुंटंड ऑफ द इयर’मधील तिची भूमिका ते आता ‘राजी’ या सिनेमातील तिचा अभिनय याची साक्ष आहे. सध्या आलिया बल्गेरीयमध्ये असून ‘ब्रम्हास्त्र’ या तिच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. अयान मुखर्जीचा हा सिनेमा असून आता आलियाच्या फॅन्सना तिच्या या सिनेमाची उत्सुकता आहे.

अशी पडले ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ हे नाव

प्रत्येक नवा सिनेमा कोणाची तरी प्रेरणा घेऊन येत असतो. आलिया आणि वरुणचा ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ हा सिनेमा आला त्यांनतर अगदी काहीच वर्षाच्या फरकान बद्रीनाथ की दुल्हनिया हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाचे नाव शाहरुखच्या सिनेमापासून घेतलेले आहे. १९९५ साली शाहरुख आणि काजोलचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे‘ हा सिनेमा रिलीज झाला होता. या नावातून प्रेरणा घेतच या सिनेमांचे नामकरण झाल्याचे कळत आहे.