घरमनोरंजन'या' कारणामुळे अमृता खानविलकारचा बिग बॉसला नकार

‘या’ कारणामुळे अमृता खानविलकारचा बिग बॉसला नकार

Subscribe

सध्या मात्र अमृता खतरे के खिलाडी १० मध्ये दिसत आहे. याच शो दरम्यान एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत तिने बिग बॉसमध्ये सहभागी होण्यास नकार देण्याचे कारण सांगितले आहे.

आपल्या ग्लॅमरस लूक आणि अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताने मराठी आणि हिंदी चित्रपटातील आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे. उत्तम अभिनयासोबतच अमृताच्या सौंदर्याचीही अनेक वेळा चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. सध्या मात्र अमृता खतरो के खिलाडी १० मध्ये दिसत आहे. याच शो दरम्यान एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत तिने बिग बॉसमध्ये सहभागी होण्यास नकार देण्याचे कारण सांगितले आहे.

- Advertisement -

अमृताने नुकताच तिचा ‘खतरों के खिलाडी पर्व १०’ या कार्यक्रमातील अनुभव एका मुलाखतीमध्ये शेअर केला. यावेळी तिला बिग बॉसशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने ‘माझ्या नवऱ्याने हिमांशूने मला परवानगी दिलेली नाही’ असे उत्तर दिले आहे. तिचे हे उत्तर ऐकून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहे. तसेच “हिमांशू हा खूप वेगळा व्यक्ती आहे. त्याला घरातही वादविवाद झालेला आवडत नाही आणि मी एका कार्यकर्मात जाऊन ते करणे ही तर फारचं लाबंची गोष्ट आहे. यंदाच्या बिग बॉसचे पर्व खरचं खूप छान होते, तरीही मी हा शो हिमांशू नसताना पाहायचे आणि तो येताच चॅनेल बदलायचे,” असा खुलासा अमृताने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -