घरताज्या घडामोडीपरिक्षा टाळण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थीनीला पाजलं कीटकनाशक

परिक्षा टाळण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थीनीला पाजलं कीटकनाशक

Subscribe

कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यात परिक्षा टाळता यावी यासाठी चक्क शिक्षाकानेच किटकनाशक दिले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

परीक्षांचा काळ सुरू झाला आहे आणि या काळात जवळपास सर्वच विद्यार्थी ताण-तणावातून जातात. अशातच कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरटी हायस्कूलमधील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला परिक्षा टाळता यावी यासाठी चक्क शिक्षाकानेच कीटकनाशक दिले असल्याचे समोर आले आहे. यानंतर या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक निलेश बाळू प्रधान यांनी विद्यार्थीनी सानिका माळीला पाण्यातून कीटकनाशक दिले. कीटकनाशक प्यायल्याने आजारी पडून परीक्षा टाळता येईल, असं तिला वाटले होते. कारण तिची परीक्षेची तयारी झाली नव्हती. २० फेब्रुवारीला सानिका शाळेत गेली, त्यावेळी प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होती. त्याचवेळी तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान २५ फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

शिक्षकाने गुन्हा केला कबूल

तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार पुढे तपास सुरू केला. पोलिसांनी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींकडे चौकशी केली. त्यानंतर शिक्षक निलेश बाळू प्रधान याने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी शिक्षक निलेश बाळू प्रधान याने सानिकाला आपणच कीटकनाशक दिल्याची कबुली पोलिसांनी दिली. त्यानंतर आरोपीला  अटक करण्यात आली. ‘सानिकाने मागितल्यानंतर मी तिला किटकनाशक दिले’ अशी कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ आणि ३२८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीने हे कृत्य का केले याची चौकशी पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -