घरमुंबईउद्या लोकलचा विलंबवार, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

उद्या लोकलचा विलंबवार, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Subscribe

उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. काही लोकलच्या वेळांमध्ये बदल करण्यात येणार असून काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

मुंबईकरांनो उद्याचा रविवार पाहून जर फिरायला जायचा प्लॅन केला असेल तर थोडे थांबा. कारण उद्या रेल्वेच्या चारही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. काही लोकलच्या वेळांमध्ये बदल करण्यात येणार असून काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण दरम्यान कल्याण दिशेकडे जाणऱ्या गाड्या धिम्या मार्गावर तर, पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते गोरेगाव दरम्यान लोकल जलद मार्गांवर वळवण्यात येणार आहेत. तर हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द केल्या जातील. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/ नेरूळ लोकल सेवा सुरू असेल. सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल सोडल्या जातील.

- Advertisement -

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे- कल्याण दरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत ब्लॉक असणार आहे. या वेळी धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. या लोकल मुलुंड ते कल्याण दरम्यान ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर थांबतील. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली स्थानका दरम्यान १०.३५ ते ३.५० या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. दोन्ही दिशेला धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावर पनवेल ते मानखुर्द दरम्यान दोन्ही मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात यणार आहे. सीएसएमटी ते वडाळा, वडाळ्याहून वाशी, बेलापूर, पनवेल या स्थानकादरम्यान १० ते ४ पर्यंत एकही लोकल धावणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -