घरमनोरंजनमलायका बरी हिच्यापेक्षा... अरबाजची दुसरी बायको कपड्यांवरुन होतेय ट्रोल

मलायका बरी हिच्यापेक्षा… अरबाजची दुसरी बायको कपड्यांवरुन होतेय ट्रोल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान 24 डिसेंबर रोजी शूरा खानसोबत विवाह बंधनात अडकला. अरबाजच्या या लग्नाने सगळेचजण आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, नुकतेच हे दोघे डिनर डेटसाठी जाताना स्पॉट झाले. त्याचवेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकजण या दोघांना ट्रोल करताना दिसत आहेत.

कपड्यांवरुन शूरा खान होतेय ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अरबाज आणि शूरा खान डिनर डेटसाठी जाताना अनेकदा स्पॉट होतात. परंतु नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हे दोघेही एकमेकांचा हात पकडून चालत आहेत शिवाय या दोघांनी एकसारखा टी-शर्ट घातला आहे. परंतु टी-शर्टखाली शूराने पँण्ट घातलेली नाही. ज्यावरुन ट्रोलर्स तिला ट्रोल करताना दिसत आहेत. एका युझरने कमेंटमध्ये लिहिलंय की, तुझी पँण्ट कुठे आहे? तर दुसऱ्या युझरने लिहिलंय की, शूरापेक्षा चांगली तर मलायका आहे. तसेच काहीजण अरबाज आणि शूरामधील वयावरुन देखील त्यांना ट्रोल करत आहेत.

- Advertisement -

कोण आहे शूरा खान?

अरबाजची नवी गर्लफ्रेंड शूरा खान एक व्यावसायिक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. ती इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करते. अरबाज आणि शूराची पहिली भेट अरबाजच्या आगामी ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले होते.

मलायकासोबत झालं होतं पहिलं लग्न

मलायका आणि अरबाज खानचं लग्न 1998 मध्ये झालं होतं. 19 वर्षानंतर 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाज अनेकदा मुलासोबत एकत्र दिसून येतात. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आलिया-रणबीरला निमंत्रण मिळाल्याने युझर्स नाराज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -