घरक्राइमसातारा : Shambhuraj Desai विरोधात पोस्ट लिहिणाऱ्या Shiv Sena तालुका प्रमुखाला अटक

सातारा : Shambhuraj Desai विरोधात पोस्ट लिहिणाऱ्या Shiv Sena तालुका प्रमुखाला अटक

Subscribe

एकेकाळी काकासाहेब जाधव हे शंभूराज देसाई यांचे निकवर्तीय मानले जात होते. आता शंभूराज देसाईंच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यानंतर राजकीय वर्तुळता चर्चेला उधाण आले आहे.

सातारा : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्या शिवसेनेतील (शिंदे गट) तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात काकासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी जाधव यांना अटक देखील केली आहे. या प्रकरणातून शिंदे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

‘शिवसेना एकनाथजी शिंदे ग्रुप’ या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कराड तालुक्यात शिंदे गटातील मोठ मोठ्या पदावरी नेते शिवसैनिक आहेत. यात काकासाहेब जाधव देखील ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपवर जाधवांनी सांगितले की, शंभूराज देसाई हे मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन फसवत असल्याचे मत काकासाहेब जाधव यांनी मत मांडले. याशिवालय काकसाहेब जाधवांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. या व्हॉट्सअॅप ग्रुपवर गुलाबराव शिंदे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात काकासाहेब जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेचा निकाल 10 जानेवारीलाच? अध्यक्षांकडून मसुदा कायदे तज्ज्ञांकडे

काकासाहेब जाधव यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीमध्ये महिलांना आक्षेपार्ह भाषा वापरून शंबूराज देसाईंची सोशल मीडियावर बदनामी केली आहे, असे म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी काकासाहेब जाधव यांना अटक केले आहे.  एकेकाळी काकासाहेब जाधव हे शंभूराज देसाई यांचे निकवर्तीय मानले जात होते. आता शंभूराज देसाईंच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यानंतर राजकीय वर्तुळता चर्चेला उधाण आले आहे. पहिल्यांदाच शिंदे गटातील अंगर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष्य लागेल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -