घरमनोरंजन'पानिपत'मधील महत्त्वाच्या तीन पात्रांचे पोस्टर रिलीज

‘पानिपत’मधील महत्त्वाच्या तीन पात्रांचे पोस्टर रिलीज

Subscribe

आता चित्रपटातील तीन प्रमुख पात्रांच्या व्यक्तिरेखांचं पोस्टर सुद्धा रिलीज करण्यात आलं आहे.

मराठा साम्राज्य अबादीत ठेवण्यासाठी करण्यात आलेले महायुद्ध पानिपतच्या रणभूमीत पार पडले. हाच इतिहास रुपेरी पडद्यावर साकारण्यात येत आहे. दिग्दर्शक-निर्माता आशुतोष गोवारीकर ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाच्या माध्यमातून हा इतिहास प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यातून आपण पानिपतमधील प्रमुख पात्रांची ओळख करुन घेतली. आता चित्रपटातील तीन प्रमुख पात्रांच्या व्यक्तिरेखांचं पोस्टर सुद्धा रिलीज करण्यात आलं आहे.

कोण आहेत या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा?

अभिनेता अर्जुन कपूर याने या तीन महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचे पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. एका पोस्टरमध्ये मॉडल, अभिनेता साहिल सलाथिया दिसत आहे. त्याची वेशभूषा लक्षात घेतली तर तो या चित्रपटात समशेर बहादुरची भूमिका साकारत आहे. समशेर हा बाजीराव आणि मस्तानीचा पुत्र होता.

- Advertisement -

त्यानंतर अर्जुन कपूरने पोस्ट केलेल्या पोस्टरमध्ये सुजा-उद-दौला याची व्यक्तिरेखा आहे. तर तिसऱ्या पोस्टरमध्ये पानिपतमधील सकीना बेगम ही व्यक्तिरेखा दिसत आहे. खूप वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणारी ज्येष्ठ अभिनेत्री झिनत अमान ही पानिपतमध्ये सकीना बेगमची भूमिका साकारत आहे.

- Advertisement -

दरम्यान अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री क्रीती सेनॉन आणि अभिनेता संजय दत्त यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हेही वाचा – राज ठाकरे यांनी केले ‘पानिपत’ चित्रपटाचे कौतुक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -