घरमनोरंजनऐश्वर्या राय प्रेग्नंट? सोशल मीडियावर फोटो व्हायरल,अभिषेक म्हणतो...

ऐश्वर्या राय प्रेग्नंट? सोशल मीडियावर फोटो व्हायरल,अभिषेक म्हणतो…

Subscribe

सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचा एक फोटो झपाट्याने व्हायरल होत आहे. या फोटो आहे अंबानी यांच्या घरी रंगलेल्या पार्टीचा. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक कलकारांनी हजेरी लावली. या पार्टीत ऐश आणि अभिषेक सहभागी झाले होते. मात्र यावेळी ऐश आणि अभिषेकच्या फोटोमुळे सध्या सोशलमिडीयावर चर्चा रंगली आहे. हा फोटो बघताच ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

या पार्टीत ऐशने लाल रंगाचा ड्रेस घातला होता आणि ओढणी घेतली होती. फोटोच्या वेळी चुकीच्या पध्दतीने उभे राहल्यामुळे आणि चुकीच्या पध्दतीने ओढणी घेतल्यामुळे ऐश प्रेग्नंट आहे की काय असा संशय निर्माण झाला आहे. हा फोटो व्हायरल होताच सोशलमिडीयावर चर्चा रंगल्या आहेत. ऐश्वर्या पुन्हा आई होणार? ऐश्वर्याचे अभिनंदन अशा अनेक कमेंटस या फोटोवर आल्या आहेत.

- Advertisement -

या आधीही ऐश्वर्या आणि अभिषेक बाहेर फिरायला गेले असता एका बीचवरील त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी देखील ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याच्या अफवा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र कॅमेऱ्याच्या चुकीच्या एॅगलमुळे असा फोटो आल्याचे समजले. मात्र हे दोनही फोटो व्हायरल झाल्या नंतर बच्चन कुटूंबाकडून कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही.

View this post on Instagram

Happy New Year. ?

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -