घरमुंबईराज्यात राष्ट्रपती राजवट? राज्यापालांचा वेळ वाढवून देण्यास नकार!

राज्यात राष्ट्रपती राजवट? राज्यापालांचा वेळ वाढवून देण्यास नकार!

Subscribe

सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार नाही असे भाजपने घोषित केल्यानंतर आता शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, शिव-महाआघाडीचे सरकार बनेल असे खात्रीलायक सूत्रांकडून समजत असून, १२ नोव्हेंबरला यावर अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला असून, मुख्यमंत्री पाच वर्षे शिवसेनेचा असेल तर उपमुख्यमंत्री पद हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अडीच-अडीच वर्षे असेल असे या फॉर्म्युल्यामध्ये ठरले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला २० मंत्रीपदे तर शिवसेनेला २० मंत्रीपदे असा फॉर्म्युला देखील ठरल्याचे समजत आहे.


महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने; राज्यपालांनी शिवसेनेला वाढीव वेळ नाकारली

- Advertisement -

थोड्याच वेळात सेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा


सोनिया गांधीचे मत वळवण्यात सेनेला यश

- Advertisement -

निकालनंतर मागील १८ दिवसानंतर सत्ता कोणाची येणार याबाबत कोणताही निर्णय न झाल्यामनुळे राष्ट्रपती राजवट लावण्याचे संकेत वारंवार मिळत होते. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेने प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मन वळवले आणि कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यावर एक मत केले.


शिवसेना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट

कॉंग्रेसने शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठींबा दिल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. थोड्याच वेळात शिवसेना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल होतील.


१० जनपथवर राज्यातील कॉंग्रेसचे नेत अजूनही बैठकीत


आदित्य ठाकरे राजभवनाकडे निघाले

मातोश्रीतून आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे राजपालांच्या भेटीकरता राजभवनाकडे निघाले आहेत.


उद्धव ठाकरे यांची सोनिया गांधींशी फोनवरून चर्चा

काँग्रेसच्या बैठकी अगोदर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून आमंत्रण मिळालं असून, काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. त्याचा एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आहे.


भाजप कोअर कमिटीची बैठक

भाजप कोअर कमिटीची बैठक थोड्याच वेळात सुरु होणार आहे. या बैठकी दरम्यान भाजपाच्या पुढील रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे आता भाजपाचा पुढचे पाऊल कोणते असणार हे पाहाव लागणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार ‘वर्षा’ दाखल झाले आहे.


सोनिया गांधीचा सेनेसोबत जाण्यास नकार?

सोनिया गांधी यांची राज्यातील कॉंग्रेस नेत्यांसोबत सध्या बैठक सुरु असून त्यांनी सेनेसोबत जाण्यास नकार दिल्याची माहती सूत्रांकडून येत आहे. सोनिया गांधी सेनेसोबत जाण्यात तयार नसल्याचे बोले जात आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते सोनिया गांधींचे मन वळवण्यासाठी यशस्वी होणरा का हे पहावे लागणार आहे.


खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल

शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना प्रकृतीच्या कारणामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार आहेत. डॉ. जलील सरकार यांच्या टीमच्या देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर अॅन्जीओग्राफी होणार असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळत आहे.


शिवसेनेची भूमिका पूर्णत: चुकीची – सदाभाऊ खोत

‘शिवसेनेने घेतलेली भूमिका पूर्णत: चुकीची आहे. विधानसभेसाठी इतर मित्रपक्षांसाठी सोडलेल्या जागा वगळता उरलेल्या जागा ५०-५० टक्के वाटून घेण्याचा निर्णय ठरल्याचे बोले जात आहे. मात्र, ५० – ५० टक्के सत्ता वाटून काही अर्थ नाही. ज्या पक्षाच्या जागा जास्त त्या पक्षाने सत्ता स्थापन करावी. तसेच ज्या पक्षाच्या जास्त जागा असतात ते आपली सत्ता स्थापन करु शकतात. जनतेने आपले काम प्रामाणिकपणे केले आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापन करणे हे पक्षाचे काम आहे. मात्र, भाजप – शिवसेनेची युती तुडली हे योग्य झाले नाही’, अशी प्रतिक्रिया कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -