अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूड हादरलं आहे. सुशांतच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. कुटुंबीय तर अद्याप या घटनेमुळे सावरलेलं नसून सुशांतच्या या अशा अचानक जाण्याचा धक्का त्याच्या चाहत्यांना देखील तितकाच बसला आहे. दरम्यान, बॉलीवूड कलाकारांनी ट्विटरवर ट्वीट करून त्याला श्रद्धांजली वाहिली असून राजकारणातील आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींनी देखील त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर अर्जुन कपूरने सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली देण्यासोबतच इंस्टाग्रामवर केलेल्या त्याच्यासोबतच्या शेवटच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.
१८ महिन्यापूर्वी माझ्यासाठी त्याचा शेवटचा मॅसेज
अर्जुन कपूरने सुशांत सिंह राजपूत सोबत जे whatsapp चॅट शेअर केले आहेत ते १८ महिन्याअगोदरचे आहे. अर्जुन कपूरने स्वत:आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ही माहिती दिली आहे. अर्जुनने इंस्टाग्राम वर लिहिले आहे की १८ महिन्यापूर्वी माझ्यासाठी त्याचा शेवटचा मॅसेज होता. जेव्हा त्यांने केदारनाथ चित्रपटाच्या रिलीजच्या एका आठवड्यानंतर आपल्या आई विषयी पोस्ट केली होती. तो आपल्या आईची खूप आठवण काढत होता. त्यावेळी त्याच्या चित्रपटाची शूटिंग सुरू होणार होती. मी त्यावेळी त्याला चांगले ओळखत नव्हतो, पण यशराज फिल्म्स, इवेंट्स स्क्रिनिंग दरम्यान तो मला भेटला होता.
त्या ठिकाणी त्याला जरूर शांती मिळेल
त्याने पुढे असेही लिहिले आहे की, सुशांतचे असे पाऊल उचलण्यामागच्या त्याच्या भावना मी समजू शकतो. कारण मी ही त्या वेदना समजू शकतो. ज्या सुशांतने आपल्या आईला गमावल्याबद्दल आणि त्याच्या एकांतवासात त्याने अनुभवल्या आहेत. अर्जुनने लिहिले आहे कि, आता मला आशा आहे की, माझा मित्र एका उत्कृष्ठ आणि आनंदी जगामध्ये आहे. मला आशा आहे की, त्या ठिकाणी त्याला जरूर शांती मिळेल.