घरदेश-विदेशसुशांत आमचा खरा मित्र होता; इस्त्राइलने केली भावना व्यक्त

सुशांत आमचा खरा मित्र होता; इस्त्राइलने केली भावना व्यक्त

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाची बातमी येताच संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता परदेशातूनही त्या निधनावर दुःख व्यक्ते केले जात आहे. साता समुद्रापार असलेल्या इस्त्राइलमधून सुशांतला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. सुशांतसाठी इस्त्राइलमधून खास संदेश आला आहे. या देशाने सुशांतला आपला खरा मित्र म्हटले आहे. इस्त्राइलच्या वतीने परदेश मंत्रालयाचे जनरल आणि डेप्युटी डायरेक्टर गिलाड कोहेन यांनी सुशांतसाठी संदेश पाठवला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुशांतची आठवण व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी सुशांतच्या निधनावर दुःख व्यक्त करतो. तो इस्त्राइलचा खरा मित्र होता. तुमची खुप आठवण येईल. जेव्हा ते इस्त्राइलला आले होते, तेव्हा असे काही झाले होते की,

- Advertisement -

ट्विट करून सांगितली आठवण 

सुशांत सिंह राजपूतच्या ड्राइव्ह या अखेरच्या ठरलेल्या चित्रपटातील एक गाणं इस्त्राइलमध्ये शूट करण्यात आले होते. मखणा… असे या गाण्याचे बोल होते. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी ड्राइव्ह चित्रपटाची संपूर्ण टीम इस्त्राइलमध्ये आली होती. त्या गाण्याची लिंक देखील या ट्विटमध्ये शेअर करण्यात आली आहे. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा –

महापालिका सुरक्षा, अग्निशमन दलाच्या २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -