घरमनोरंजनNo Entry Sequel: 16 वर्षांनी पुन्हा एकदा सलमान खान दिसणार 'प्रेम भाई'च्या...

No Entry Sequel: 16 वर्षांनी पुन्हा एकदा सलमान खान दिसणार ‘प्रेम भाई’च्या भूमिकेत

Subscribe

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 2005 साली रिलीज झालेला ‘नो एंट्री’ ( No Entry)सिनेमाचा सिक्वेल घेऊन सलमान खान लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान तब्बल 16 वर्षांनी ‘नो एंट्री’ या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सिक्वेल तयार करणार आहे अशी महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. गेल्या वेळी या सिनेमात सलमान खानचा फक्त कॅमियो होता. पण यंदा सलमान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. (Salman Khan All Set For No Entry sequel with a lead role)

‘नो एंट्री’ सिनेमाचे दिग्दर्शक अनीस बज्मी  (Anees Bazmi) यांनी सिनेमाच्या सिक्वेल बाबत अद्याप अधीकृतपणे घोषणा केली नाहीये. पण सिनेमाचे निर्माता बोनी कपूर (Boney Kapoor) आणि सलमान खान नो एंट्री सिनेमाच्या सिक्वेलची तयारी करत आहे अशी माहिती समोर येत आहे. यंदा हा सिनेमा कोन दिग्दर्शित करणार आहे. आणि सिनेमात सलमान व्यतिरिक्त कोणते कलाकार समाविष्ठ असणार आहे याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

- Advertisement -

‘नो एंट्री’ हा एक मल्टी स्टारर सिनेमा होता. या सिनेमात अनिल कपूर (Anil Kapoor) ,फरदीन खान (Fardeen Khan) , लारा दत्ता (Lara Dutta), सेलिना जेटली (Celina Jaitley), ईशा देओल (Esha Deol) , बिपाशा बसु (Bipasha Basu) बोमन ईरानी (Boman Irani) यांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. सलमान खान या सिनेमात केवळ 40-45 मिंनंट झळकला होता. प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगलीच पसंती दर्शवली होती.तसेच बॉक्स ऑफीसवर या सिनेमाने तुफान कमाई केली. आता सलमान खान या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे हे कळताच चाहत्यांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच नो एंट्रीच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

- Advertisement -

हे हि वाचा – KBC13च्या यंदाच्या पर्वामध्ये झाला महत्वपूर्ण बदल, फास्टेस फिंगर फर्स्ट पर्याय होणार गायब

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -