घरदेश-विदेशजगातील १०० श्रीमंतांमध्ये डी-मार्टचे मालक राधाकृष्ण दमानी, तब्बल १.४३ लाख कोटींचे आहेत...

जगातील १०० श्रीमंतांमध्ये डी-मार्टचे मालक राधाकृष्ण दमानी, तब्बल १.४३ लाख कोटींचे आहेत मालक

Subscribe

 सर्वात स्वस्त आणि चांगल्या ऑफर्स देत डी-मार्टने भारतीय बाजारपेठेत मोठा ग्राहक वर्ग जमा केला. याच डी-मार्ट चेन चालवणाऱ्या कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे प्रवर्तक आणि मालक राधाकृष्ण दमानी आता जगातील पहिल्या १०० श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत. ब्लूमबर्ग बिलेयनिअर्स इंडेक्सुनुसार, दमानी यांनी आत्तापर्यंत १.४३ लाखको संपत्ती कमावत जगातील ९७ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. गेल्या १८ महिन्यांत त्यांच्या संपत्तीत ६० टक्क्यांनी वाढ होत ती १९.३ अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे.

एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात ६१ टक्क्य़ांनी वाढ झाली. या काळात कंपनीला ११५.१३ कोटींचा निव्वळ नफा झाला. यासह महसुलातही ३१ टक्क्यांना वाढ झाली. यंदा राधाकृष्ण दमानींनी मुंबईतील सर्वात महागड्या परिसरात म्हणजेच मलबार हिल्समध्ये ५७५२,११ चौरस मीटरचे तब्बल १००१ कोटी रुपयांचे घर खरेदी केले. दमानी आणि प्रवर्तक समूहाचा एव्हेन्यू सुपरमार्टमध्ये ७४.९० टक्के हिस्सा आहे. दमानीची आणि काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. इंडिया सिमेंटमध्ये ११.३ टक्के, व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये २६ टक्के, सुंदरम फायनान्समध्ये २.४ टक्के हिस्सा आहे.

- Advertisement -

९० च्या शतकात दमानींनी शेअर बाजारातून कोट्यवधी रुपये उभे केले होते. यात गेल्या वर्षीच त्यांची संपत्ती एवढ्या मोठ्याप्रमाणात वाढली की ते देशातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहभागी झाले. दीर्घकाळ स्टॉक मार्केटर म्हणून काम करणाऱ्या दमानी यांनी २००२ मध्ये रिटेल मार्केटमध्ये प्रवेशाची घोषणा केली. मुंबईत पहिले रिटेल स्टोअर उघडणाऱ्या दमानींचा रिटेल व्यवसाय झपाट्याने वाढला. आज मुंबईत डी-मार्टचे अनेक मोठे, छोटे असे आउटलेट आणि स्टोर्स आहेत.


Health Tips: पावसाळ्यात वाढतेय सांधे दुखीचे प्रमाण, ‘हे’ करा उपाय फॉलो करत मिळवा आराम


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -