घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: आर्यन खानला NCBकडून समन्स; आजच चौकशीला हजर राहण्याची शक्यता

Cruise Drugs Case: आर्यन खानला NCBकडून समन्स; आजच चौकशीला हजर राहण्याची शक्यता

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबी (NCB) दिल्लीच्या एसआयटीने (Delhi SIT) समन्स पाठवला आहे. माहितीनुसार, एसआयटीने आर्यन खानला आज चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे आज क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीची चौकशी होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. एनसीबीचे विशेष पथक ६ प्रकरणाची चौकशी करत आहे. ज्यामधील सर्व आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळेच आर्यनचा आज समन्स बजावण्यात आला आहे. (Aryan Khan to be summoned by Delhi NCB SIT team in drugs case)

आर्यन खानसोबत एनसीबीच्या एसआयटीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचा जावई समीर खानला देखील चौकशीसाठी समन्स बजावला आहे. ज्या ६ प्रकरणाची एसआयटी चौकशी करत आहे, त्यासंबंधित सर्व लोकांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. एनसीबीचे विशेष पथक क्रूझवर गेले होते आणि क्राईम सीन रिक्रिएट केला होता. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी अरबाज मर्चेंटला देखील एनसीबीच्या एसआयटीने चौकशीसाठी समन्स बजावला आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी आर्यन खान जामीन मिळाल्यानंतर आर्थर रोड जेलबाहेर आला आहे. एनसीबीने २ ऑक्टोबरला रात्री कॉर्डेलिया क्रूझहून आर्यनला ताब्यात घेतले होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणात अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचासह इतरांना अटक करण्यात आली होती.


हेही वाचा – आता घोटाळा अशोक चव्हाणांचा, ५४ कोटी कुठल्या मंत्र्यांचे?; सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -