घरताज्या घडामोडीअभिनेते जितेंद्रने केला खुलासा, म्हणाले एकता कपूर वाढत्या वजनाने झाली होती हैराण

अभिनेते जितेंद्रने केला खुलासा, म्हणाले एकता कपूर वाढत्या वजनाने झाली होती हैराण

Subscribe

जितेंद्र यांनी एकता कपूर हिच्या बालवणीच्या काही गोष्टींचा खुलासा केला.

बॉलिवूड निर्माती एकता कपूरला सध्या तिच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच एकता कपूर आणि तिचे वडील अभिनेते जितेंद्र ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाली होती. यावेळी दोघांना अनेक मजेशीर प्रश्न विचारण्यात आले. एव्हर ग्रीन जितेंद्र यांच्यासोबत गप्पा मारताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांनी देखील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. जितेंद्र यांनी एकता कपूर हिच्या बालवणीच्या काही गोष्टींचा खुलासा केला.

- Advertisement -

एकता लहानपणापासून फार हेल्दी आणि गुडगुडीत होती. मात्र ती जशी जशी मोठी झाली तशी तिच्या वजनाबाबत अनेक चिंता तिला सतावू लागल्या. तिच्या वाढत्या वजनामुळे तिला करिअरमध्ये अनेक अडथळे येऊ लागले होते. जितेंद्र यांनी सांगितले की एकता एका स्थानीय राम लीला स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात तिने रावणाची भूमिका साकारली होती. ती जाड असल्याचे तिला ती भूमिका करण्यास सांगितले होते.

- Advertisement -

पुढे एकताने गंमतीत यामुळेच मी कधी अभिनय क्षेत्राकडे वळले नाही. आपण पाहिले तर एकता कपूर आत्तापर्यंत कोणत्याही सिनेमात अभिनेत्री म्हणून दिसलेली नाही. मालिका विश्वातील क्विन आहे. अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून एकता कपूरने लोकप्रिय शो प्रेक्षकांसाठी आणले आहेत.

एकता कपूरला पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला. पद्मश्री पुरस्कार वितरण सोहळा येत्या ८ नोव्हेंबरल दिल्ली येथे पार पडणार आहे. हा पुरस्कार घेण्यासाठी एकता कपूर वडील जितेंद्र यांच्यासोबत जाणार आहे.


हेही वाचा –  Athiya Shetty Birthday : अथियाच्या वाढदिवसानिमित्त केएल राहुलने दिली प्रेमाची कबूली

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -