घरमनोरंजनथंडी त्यात बारिश

थंडी त्यात बारिश

Subscribe

सध्या आपण भारतीय बोचर्‍या थंडीचा आनंद घेत आहोत. दिल्लीत बर्फ पडत असल्याने तिथल्या नागरिकांमध्ये हुडहुडी भरलेली आहे. काश्मिरच्या नागरिकांनी घराबाहेर न पडण्याची शपथच घेतलेली आहे. त्यात थंडीतलं बारिश हे काय प्रकरण आहे असे आपल्या मनात येण्याची शक्यता आहे. भूषण कुमार यांनी आपल्या टी-सीरिजच्यावतीने जे अल्बम प्रकाशित केलेले आहेत त्यातल्या एका अल्बमचे नाव ‘बारिश’ आहे ज्यात आतिफ असलम आणि नुसरत भरुचा दिसणार आहेत. गाणं एकच आहे ज्याचे चित्रीकरण अमेरिकेत करण्यात आलेले आहे.

पूर्वी कॅसेटची किंवा अल्बमची निर्मिती करायची झाली तर काहीही करा त्यात सात-आठ गाणी असायलाच हवी, असे कॅसेट कंपनीचे सांगणे होते. संगीतकार, गायक यांची दमछाक व्हायचीच; पण अल्बम फारसा चालला नाही तर निर्मात्यालाही त्याचा तोटा सहन करावा लागत होता. आता एकच गाणे सोशल नेटवर्कच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवायचे आहे म्हटल्यानंतर बर्‍याचशा अल्बमचे चित्रीकरण परदेशात होऊ लागलेले आहे. या अल्बमचे शिर्षक ‘बारिश’ आहे म्हटल्यानंतर अमेरिकेतही आवश्यकतेप्रमाणे कृत्रिम पाऊस पाडला असणार यात काही शंका नाही. डेव्हिड जेनी यांनी या अल्बमचे दिग्दर्शन केलेले आहे. या निमित्ताने लॉस एन्जिलीसची खुबसुरती रसिकांना पहाता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -