घरमनोरंजनबिग बॉस मराठी: घरातले सदस्य करणार 'कानगोष्टी'

बिग बॉस मराठी: घरातले सदस्य करणार ‘कानगोष्टी’

Subscribe

बिग बॉसचं घर म्हणजे ड्रामा, मस्ती आणि एंटरटेनमेंटचं पॅकेजच. पुढल्या आठवड्यात घरातील सदस्य एकमेकांना 'कानगोष्टी' सांगणार आहेत.

बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच लोकप्रिय ठरतो आहे. शोमधील सदस्यांपासून ते महेश मांजरेकरांच्या सूत्रसंचलनापर्यंत सर्वच गोष्टी लोकांना खूप आवडत आहेत. शनिवारी प्रदर्शित झालेल्या भागात महेश मांजरेकरांनी घरातील सगळ्याच सदस्यांना फैलावर घेतलं होतं. गेल्या संपूर्ण आठवड्यात घरामध्ये झालेले टास्क, सदस्यांचे वादविवाद, त्यांच्यात झालेले मतभेद या सगळ्याचा लेखाजोखा मांजरेकर यांनी शनिवारच्या भागत मांडला. यावेळी मेघा घाडेपासून ते आस्ताद काळेपर्यंत सगळ्यांनाच महेश मांजरेकरांनी चांगलेच झापले.

शनिवारी घेतली सदस्यांची ‘शाळा’

काल प्रदर्शित झालेल्या भागामध्ये महेश मांजरेकरांनी सर्वच सदस्यांची शाळा घेतली. गेल्या आठवड्यात नंदकिशोर यांना हुकुमशाहा बनवण्यात आले होते. त्यावेळी नंदकिशोर यांनी अन्य सदस्यांशी केलेल्या गैरव्यवहराचा जाब मांजरेकरांनी त्यांना विचारला. याशिवाय मेधा घाडे आणि सई लोकूर यांनी टास्कमध्ये केलेल्या झेंडा लपवण्याच्या चुकीवरुन मांजरेकरांनी त्यांना चांगलेच खडसावले. तर दुसरीकडे हुकुमशाहाच्या टास्कमध्ये रेशम टिपणीस नंदकिशोरच्या बाजूने खेळल्यामुळे मांजरेकरांनी तिची चांगलीच कानउघडणी केली. पुष्कर जोग, शर्मिष्ठा राऊत आणि आऊ अर्थात उषा नाडकर्णी यांची शाळा घ्यायलाही मांजरेकर विसरले नाहीत. या सगळ्या ड्रामेबाजीनंतर आता रविवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘विक-एण्डचा डाव’मध्ये नेमकं काय घडणार, कोणता सदस्य घराबाहेर जाणार? तसंच मांजरेकर पुन्हा कोणावर तोफ डागणर या सगळ्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली असणार हे नक्की.

- Advertisement -

रंगणार ‘कानगोष्टीं’चा खेळ

दरम्यान आज प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडमध्ये महेश मांजरेकर सर्व सदस्यांसोबत एक नवा खेळ खेळणार आहेत. हा खेळ असणार आहे ‘कानगोष्टींचा’. या खेळामध्ये प्रत्येक सदस्याने सहभागी व्हायचे असून, खास तयार करण्यात आलेल्या एका ‘कानामध्ये’ त्यांना इतर सदस्यांबाबतचं आपलं मत बोलून दाखवायचं आहे. आता या ‘कानगोष्टीं’ कोणाच्या पथ्यावर पडतायत हे आजच्या एपिसोडमध्ये कळेलच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -