घरताज्या घडामोडीBigg Boss Marathi 3: गायत्री ठरली उत्तम कॅप्टन आणि टास्क संचालक

Bigg Boss Marathi 3: गायत्री ठरली उत्तम कॅप्टन आणि टास्क संचालक

Subscribe

प्रत्येक खेळाडूच्या संयमाची कसोटी पाहणाऱ्या नवनवीन खेळांमुळे मराठी ‘बिगबॉस मराठी ३’ मधील रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. टास्क दरम्यान दुखापत झाल्याने अभिनेत्री गायत्री दातार बॅक फुट गेल्याचे दिसले मात्र तरीही देखील गायत्री जिद्दीने कॅप्टन बनली आणि तिने उत्तररित्या घराची जबाबदारी निभावली. मागच्या संपूर्ण आठवड्यात  खेळ जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू कसोशीने प्रयत्न करत असून या सगळ्यात गायत्री दातार अव्वल ठरत आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यात कॅप्टनपदाची जबाबदारी गायत्रीवर होती. कॅप्टन आणि बिग बॅासकडून दिल्या जाणाऱ्या टास्कची संचालक अशा दुहेरी जबाबदाऱ्या तिने उत्तमरित्या निभावल्या. जसजसा बिगबॉसचा खेळ पुढे सरकत आहे, तसा गायत्रीचा उत्तम खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅप्टनपदाची भूमिका तिने चोख निभावली याबद्दल बिगबॉसमधील बाकीच्या खेळाडूंसह सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही तिचे कौतुक केले.

- Advertisement -

केवळ महेश मांजरेकर नाही तर प्रेक्षकही तिच्या खेळाचे कौतुक करत आहेत. कॅप्टन असताना तिने कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. गायत्रीच्या या उत्तम खेळामुळे तिचे चाहते तिच्यावर भलतेच खुश आहेत. गायत्रीने संचालक म्हणून देखील उत्तम भूमिका निभावली होती. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील फॅमिली वीक सुरू होणार आहे. या वीकमध्ये स्पर्धकांना खऱ्या अर्थाने आरसा दिसणार आहे. आता बिग बॉसच्या घरातील फॅमिली वीक कशाप्रकारे रंगतोय हे पाहणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – 83 Movie : रणवीर सिंह ‘कपिल देव’ यांच्या भूमिकेत दिसतोय हुबेहुब ; पाहा फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -