Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Coronavirus: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला कोरोनाची लागण

Coronavirus: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला कोरोनाची लागण

Related Story

- Advertisement -

देशातील कोरोनाची दुसरी लाट थांबायची नाव घेत नाही आहे. कडक निर्बंधांनंतरही कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. दरम्यान अनेक बॉलिवूड कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. यापूर्वी दीपिका पादुकोणचे वडील जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण कोरोनाबाधित आढळले होते.

मागच्या आठवड्यात दीपिकाचे वडीलांना कोरोनाची लागण झाली होती आणि अलीकडेच त्यांची प्रकृती आणखीन बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. आता स्वतः दीपिकाला पादुकोण कोरोनाच्या अचाट्यात अडकली आहे.

- Advertisement -

६५ वर्षी दीपिकाचे वडिलांना सतत ताप येत असल्यामुळे बंगळूरच्या एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. माहितीनुसार, दीपिकाच्या वडिलांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे आणि ते रिकव्हर होत आहेत. शिवाय सर्व काही ठिक झाले तर त्यांना २ ते ३ दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

दीपिका आई आणि बहीण देखील कोरोना पॉझिटिव्ह

दीपिकाचे वडील पॉझिटिव्ह आल्यानंतर दीपिकाची आई आणि बहीण अनीशाची कोरोना चाचणी केली आणि ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सध्या दीपिका पादुकोण आपल्या कुटुंबियांसोबत बंगळूरमध्ये आहे. दीपिका आणि तिचे कुटुंबिय जीवघेण्या कोरोनातून मुक्त व्हावे, अशी चाहते आता प्रार्थना करू लागले आहेत.

- Advertisement -

दरम्यान आज बिग बॉस सीझन १४ची मराठमोळी स्पर्धेक निक्की तांबोळीचा भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून निक्कीचा भाऊ कोरोनाची झुंज देत होता. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि आज सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला.


हेही वाचा – मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कपल सखी आणि सुव्रतला झाली कोरोनाची लागण


 

- Advertisement -