घरमनोरंजनCorona Update: येत्या गुरूवारपासून ३१ मार्चपर्यंत मालिका,चित्रपटांचे चित्रीकरण रद्द

Corona Update: येत्या गुरूवारपासून ३१ मार्चपर्यंत मालिका,चित्रपटांचे चित्रीकरण रद्द

Subscribe

करोना विषाणूने सगळेच हैराण आहेत. केवळ देशभरात नाहीतर जगभरात करोनाने थैमान घातले आहे. सुरूवातीला चीनमध्ये असणाऱ्या या व्हायरसने आता भारतातही हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे. जवळपास ९० देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे. करोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात येऊन येत्या गुरूवारपासून (१९ मार्चपासून) ते ३१ मार्टपर्यंत मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकांचे चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रविवारी मुंबईत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईड, इंडियन मोशन प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स ओसोशिएनची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सीरिज आणि जाहिरात असे कुठलेही चित्रीकरण करता येणार नाही.

- Advertisement -

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकाने जमाव बंदीचे आदेश जारी केले आहेत. तसेच नाट्यगृह, सिनेमागृह, शॉपिंग मॉल, अशी सर्व ठिकाणं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी चित्रपट संघटनांनी देखील पुढाकार घेऊन १९ ते ३१ मार्चपर्यंत चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कारण सिनेमांचे, मालिकांचे दिवस रात्र चित्रीकरण सुरू असते. चित्रीकरणासाठी एका ठिकाणी अनेक लोक एकत्र काम करतात. गर्दीच्या ठिकाणी करोनाचा प्रसार होऊ शकतो. यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या २ दिवसात आधी ठरविल्याप्रमाणे आधी ठरल्याप्रमाणे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -