घरताज्या घडामोडीDadasaheb Phalke Awards: 'पुष्पा'ने मिळवला Film Of The Year 2022चा किताब

Dadasaheb Phalke Awards: ‘पुष्पा’ने मिळवला Film Of The Year 2022चा किताब

Subscribe

मुंबई येथे २० फेब्रुवारी रोजी दादासाहेब फाळके पुरस्कार पार पडला. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री यांसह सर्वोत्कृष्ट चित्रपटांना दादासाहेब पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार चित्रपटसृष्टीपासून ते मनोरंजन जगातील मालिका आणि त्यातील उत्तम कामगिरी करणाऱ्या कलाकारांना ही देण्यात आला.

‘पुष्पा’ या चित्रपटाला फिल्म ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला. १७ डिसेंबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रर्दशित झाला असून या चित्रपटाने कमी काळात कोट्यवधींचा टप्पा पार केला होता..

- Advertisement -

बॉलिवूड मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराचा मानकरी ‘रणवीर सिंह’ ठरला असून रणवीरला ’83’ या चित्रपटातील अभिनयामुळे हा पुरस्कार देण्यात आला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं अजूनही कौतुक केलं जातं. अभिनेत्री ‘कृति सेनन’ हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. ‘मिमी’ या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे हा पुरस्कार देण्यात आला असून तिने या चित्रपटात सेरोगेट आईची व्यक्तिरेखा साकारली होती.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला क्रिटिक्स बेस्ट एक्टर अवार्ड मिळाला असून अभिनेत्री कियारा अडवाणीला ही क्रिटिक्स बेस्ट एक्ट्रेस अवार्ड मिळाला. सिद्धार्थ आणि कियारा यांना ‘शेरशाह’ चित्रपटातील उत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला. ‘शेरशाह’ चित्रपटाला बेस्ट फिल्म हा पुरस्कार देखील मिळाला.

- Advertisement -

सहाय्यक अभिनेता पुरस्कार ‘सतीश कौशिक’ आणि सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार ‘लारा दत्ता’ यांना मिळाला असून, सर्वोत्कृष्ट खलनायक हा पुरस्कार ‘आयुष शर्माला’ मिळाला. त्याबरोबरच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – केन घोष , फिल्म इंडस्ट्री मधील उत्तम योगदान – आशा पारेख, क्रिटिक्स बेस्ट फिल्म- सरदार उधम, बेस्ट डेब्यू – अहान शेट्टी यांना पुरस्कार मिळाला. मनोरंजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार स्टार प्लसवरील ‘अनुपमा’ या मालिकेला मिळाला.


हेही वाचा – Raktanchal-2 : ‘रक्तांचल-२’ ला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -