घरताज्या घडामोडीसंजय राऊत खरे चाणक्य, आधी रश्मीजींचा अन् मग पवारांचा मुद्दा बाहेर काढला...

संजय राऊत खरे चाणक्य, आधी रश्मीजींचा अन् मग पवारांचा मुद्दा बाहेर काढला – किरीट सोमय्या

Subscribe

संजय राऊत हे शिवसेनेतील खरे चाणक्य असल्याची टिप्पणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली. संजय राऊत यांनी अत्यंत हुशारीने सुरूवातीला रश्मी ठाकरे आणि मग पवारांना अडचणीत आणल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. एकप्रकारे संजय राऊतांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांची इज्जत या पत्रकार परिषदेत काढली. तर दुसरीकडे पवारांचे पीएमसी बॅंक आणि एचडीआयएल असे राकेश वाधवान कनेक्शन सांगत त्यांनाही अडचणीत आणल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलेत होते. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्रावरून नेमक फोर्जरी कोण करतय असाही सवाल केला. त्य़ाशिवाय ईडीला दिलेल्या १५ कोटींच्या रूपयांच्या आरोपावरही त्यांनी खुलासा केला आहे.

राऊतांनी मुख्यमंत्र्यांचीच इज्जत काढली

संजय राऊतांनी अतिशय धुर्त पद्धतीने १० दिवसांपूर्वी रश्मी ठाकरेंचा उल्लेख हा शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तर रश्मी ठाकरेंच्या भावाचा कर्जतमध्ये देवस्थानच्या जमीनीचे प्रकरण काढले. पत्रकार परिषदेत हे मुद्दे काढत राऊतांनी स्वतःच्या मुख्यमंत्र्याची इज्जत काढली. भांडुपच्या ड्रीम मॉलमध्ये पीएमसीचे कार्यालय आहे. या पीएमसी बॅंकेवर कारवाई होणार आहे. राकेश वाधवान यांच्याशी संबंधित पीएमसी बॅंकेच्या पैशाचा वापर एचडीआयएलच्या प्रकल्पासाठी झाला होता. याच एचडीआयएल संकुलामध्ये सुप्रिय पवार हायस्कुल ही पवार हायस्कुलने बांधलेली ट्रस्टची जागा आहे. संजय राऊत हे खरे चाणक्य आहेत. त्यांनी पहिल्या टप्प्यात रश्मी ठाकरेंचा घोटाळा बाहेर काढला. दुसऱ्या टप्प्यात पीएमसी बॅंकेचा घोटाळा काढत शरद पवारांना अडचणीत आणण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील घोटाळा काढला का ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisement -

नेमकी फोर्जरी कोण करत आहे ?

रश्मी ठाकरेंनी २३ मे २०१९ आणि जानेवारी २०१९ रोजी कोर्लई ग्रामपंचायतीला पत्र लिहिले होते. त्यामध्ये अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेली ३० एप्रिल २०१४ ची घरे आमच्या नावे करावीत असे पत्रात नमुद करण्यात आले होते. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर या दोघांनीही लिहिलेल्या पत्रात ही घरे नावावर करण्याचा उल्लेख होता. ही माहिती मी माहितीच्या अधिकारातून मिळवल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१९ रोजी रश्मी ठाकरेंनी सरपंचांना पुन्हा एक पत्र लिहिले. अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी खताद्वारे घर विकत घेतली तेव्हा कोणतेही बंगले किंवा घरे नव्हती असे या पत्रात नमुद करण्यात आले. मग खरी फसवणुक कोण करत आहे ? बंगले नाहीत असे जेव्हा सांगता तेव्हा हे पत्र नेमक काय आहे असाही सवाल त्यांनी केला. त्यामुळे नेमकी चिटिंग कोण करतंय अशीही विचारणा त्यांनी केली.

संजय राऊतांना शिविचा अर्थ कळतो का ?

संजय राऊत यांनी मला दिलेल्या शिविचा त्यांना अर्थ कळतो का ? कळत नसेल तर माझ्या बायको आणि आईला जाऊन विचारा असेही ते म्हणाले. माझी बायको आणि सून दोघेही मराठी आहेत. अशा प्रकारची शिवी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून संजय राऊत देतात. कारण मी त्यांचा घोटाळा लोकांसमोर आणला. म्हणूनच अशा भाषेत राऊत शिविगाळ करत आहेत असेही ते म्हणाले. स्वतः मुख्यमंत्री १९ बंगल्यांच्या निमित्ताने १२ कोटी जनतेची फसवणुक करत आहेत तेव्हा या प्रकरणात बोलण्याची हिंमत मुख्यमंत्री किंवा शिवसेनेच्या नेत्याकडे नाही, असेही आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -