घरताज्या घडामोडीSandhya Mukherjee: प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांचे निधन, 'या' कारणामुळे होत्या चर्चेत

Sandhya Mukherjee: प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांचे निधन, ‘या’ कारणामुळे होत्या चर्चेत

Subscribe

संध्या मुखर्जी यांना 'बंगा विभूषण' आणि सर्वोत्कृष्ट पर्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आठ दशकात त्यांनी प्रसिद्ध संगीतकार एस. डी. बर्मन, नौशाद आणि सलील चौधरी यांच्या सोबत काम केले आहे.

Sandhya Mukherjee Passes Away : प्रसिद्ध बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांचे कोरोनामुळे निधन झाले. कोलकत्ता येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २७ जानेवारी रोजी त्यांची प्रकृती खालावली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कोलकत्ता येथील एसएसकेएस रुग्णालायत दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने त्यांना धक्का बसला आणि त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांत इन्फेक्शन आढळले. अखेर १५ फेब्रुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

संध्या मुखर्जी यांच्या निधनाची बातमी माहिती त्यांचे डॉक्टर शांतनु सेन यांनी ट्विटद्वारे दिली. इस्केमिक ह्रदयविकार आणि LVFमध्ये मल्टी ऑर्गन डिसफंक्शन या आजाराने ग्रस्त होत्या. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

- Advertisement -


संध्या मुखर्जी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ‘गीतश्री संध्या मुखोपाध्याय यांच्या निधनाने आपण सर्व दु:खी आहोत. तुमच्या जाण्याने आपले सांस्कृतिक जग आणखी गरीब झाले. तुमची सुरेल गाणी पुढच्या पिढ्यांना आनंद देत राहतील. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुंबीयासोबत आहेत.’

‘या’ कारणामुळे आल्या होत्या चर्चेत 

संध्या मुखर्जी या संध्या मुखोपाध्याय नावाने प्रसिद्ध होत्या. प्रजासत्ताक दिनाच्या आधी संध्या मुखोपाध्य यांच्या नावाची चर्चा रंगली होती. संध्या यांना शासनाचा पद्मश्री पुरस्कार देण्याची घोषणा केली होती मात्र संध्या यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला होता. अनेक केंद्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी पुरस्कार स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला.

- Advertisement -

संध्या यांची मुलगी सौमी सेनगुप्ता हिने दिलेल्या माहितीनुसार, संध्या यांनी आठ दशकाहून अधिक काळ संगित क्षेत्रात महत्त्वापूर्ण योगदान दिले मात्र वयाच्या ९०व्या तिची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड होणे तिला अपमानास्पद वाटत आहे आणि त्यामुळेच ती पद्मश्री पुरस्कार स्वीकारू इच्छित नाही.

संध्या मुखर्जी यांना ‘बंगा विभूषण’ आणि सर्वोत्कृष्ट पर्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आठ दशकात त्यांनी प्रसिद्ध संगीतकार एस. डी. बर्मन, नौशाद आणि सलील चौधरी यांच्या सोबत काम केले आहे.


हेही वाचा –  लतादीदींनी गायलेले इंग्रजी गाणं तुम्ही ऐकलं का? महेश काळेंनी शेअर केला video

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -